घरताज्या घडामोडीआमिर आणि करीनाच्या 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाच्या प्रदर्शनाची बदलली तारीख

आमिर आणि करीनाच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची बदलली तारीख

Subscribe

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि करीना कपूरचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. ठाकरे सरकारने राज्यातील चित्रपटगृह आणि मल्टीप्लेक्स पुन्हा सुरू करण्याचा निर्णयाचे स्वागत करत आमिर खान प्रोडक्शन आणि वायकॉम १८ स्टुडियोजने अधिकृतरित्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची नवी तारखेची घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याबाबत आमिर खान प्रोडक्शनने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

२०२२ ला ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी ‘लाल सिंह चड्ढा’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याबाबत आमित खान प्रोडक्शनने सांगितले की, ‘आम्ही सरकारने २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्याचा निर्णयाचे स्वागत करतो. महामारीमुळे आमचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट या ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होऊ शकणार नाही. आता आम्ही ‘लाल सिंह चड्ढा’ व्हॅलेंटाईन डे, २०२२ रोजी प्रदर्शित करू.’

- Advertisement -

टॉम हँक्सचा ‘फॉरेस्ट गंप (१९९४)’चा रिमेक ‘लाल सिंह चड्ढा’ असणार आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा आमिर खान आणि करीना कपूरची जोडी पाहता येणार आहे. मागच्या वर्षी या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली होती. यावर्षी मुंबईत शूटिंग पूर्ण झाली आणि त्यानंतर सेटवर चित्रपटातील कलाकारांनी केक कापून आनंद व्यक्त केला होता. या चित्रपटात आमिर खान व्यतिरिक्त दाक्षिणात्य सुप्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य देखील दिसणार आहे.


हेही वाचा – Netflix TUDUM: धकधक गर्लचे ओटीटीवर पर्दापण; ‘हिरामंडी’सह अनेक प्रोजेक्टची घोषणा


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -