घरमनोरंजनछोट्या तैमूरला घेऊन करीना पोहोचली वर्ल्डकप बघायला! फोटो व्हायरल

छोट्या तैमूरला घेऊन करीना पोहोचली वर्ल्डकप बघायला! फोटो व्हायरल

Subscribe

सध्या पतौडी कुटूंब युरोपमध्ये भारताच्या टीमला चेअरप करायला पोहचले आहे. त्यांचे यूरोपमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच यूरोपमधील सुट्टीचा आनंद लुटल्यानंतर खान परिवार विश्वचषक पाहण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. करिना-सैफबरोबर छोटा तैमुरही युरोपमध्ये सुट्यांचा आनंद घेताना दिसतोय.

View this post on Instagram

Hello from Tuscany from the Pataudi's ???

A post shared by Poonam Damania (@poonamdamania) on

- Advertisement -

करिना आणि सैफ विश्वचषक पाहण्यासाठी इंग्लंडला गेले आहेत. नऊ जूनला भारत आणि ऑस्ट्रेलिया या सामन्याचा आनंद दोघे घेणार आहेत. सामना पाहताना करिना, सैफ आणि तैमूर भारतीय संघाची जर्सी घालून भारतीय टीमला पाठिंबा देणार आहेत. भारतीय जर्सीमधील करिनाचा ग्लॅमरस लूक पाहण्यासाठी तिचे चाहते फार उत्सुक आहेत.

- Advertisement -

प्रसिद्ध ड्रेस डिझायनर पूनम दमानियाने करिना आणि सैफचे हे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये करिनाने पांढऱ्या रंगाचा फ्लोरसेंट ड्रेस परिधान केला आहे. करिनाने तैमूरला उचलून घेतले आहे. या फोटोमध्येही तैमूर नेहमीप्रमाणे गोड दिसत आहे. तर सैफचा कूल अंदाज बघायला मिळत आहे.

View this post on Instagram

Soaking in the sun ???

A post shared by Poonam Damania (@poonamdamania) on

पाच जूनपासून भारतीय संघाच्या विश्वचषकातील सामन्याला सुरूवात होत आहे. भारताचा पहिलाच सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर होत आहे. यंदाचा विश्वचषक इंग्लंडमध्ये होत असून भारतीय संघाला पाठींबा देण्यासाठी अनेक चाहते रवाना झाले आहेत. तर १६ जूनला भारतीयांसाठी महत्त्वाचा म्हणजेच भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे.

View this post on Instagram

#taimuralikhan says hello from Tuscany ❤

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -