करीना कपूरची छोट्या पडद्यावर एन्ट्री

kareena kapoor khan going to be a part of tv serial spy bahu know the full details
करीना कपूरची छोट्या पडद्यावर एन्ट्री

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या हटके स्टाईलमुळे नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. करीना आज एक फॅशन आयकॉन चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिच्या फॅशन स्टेटमेंट्सची नेहमीच चर्चा होते. करीना कपूर खान जेव्हा घरातून बाहेर पडते तेव्हा तिने केलेल्या स्टाईलिंगची सर्वात जास्त चर्चा रंगते. मात्र आता ती एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. करिनाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. पण आता ती चाहत्यांना एक खास सरप्राईज घेऊन आली आहे. करीना कपूर लवकरचं छोट्या पडद्यावर एन्ट्री घेत आहे.

हिंदी कलर्स वाहिनीवरील एका मालिकेत करीना भूमिका साकारणार आहे. ‘स्पाय बहू’ असं या मालिकेचं नाव आहे. करीना कपूर खान डेली सोपचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. एक प्रेमकथेवर आधारित ही एक मालिका असणार आहे.

या मालिकेचा प्रोमा नुकताच रिलीज झाला. यात करीना कपूर मालिकेतील सेजल (सना सय्यद) आणि योहान (सेहबान अझीम) या मुख्य कलाकारांची ओळख करुन देताना दिसतेय. सेजल आणि योहान हे दोघे या मालिकेचे मुख्य कलाकार आहेत.

‘स्पाय बहू’च्या कथेबद्दल सांगायचे झाल्यास सेजल ही एक गुप्तहेर असते आणि ती योहान या एका संशयित दहशतवाद्याच्या प्रेमात पडते. येथूनच त्यांच्यातील असामान्य प्रेमकहाणी घडते. दोघेही एकमेकांच्या वास्तवाची जाणीव न ठेवता प्रेमात पुढे जाऊ लागतात. त्याच वेळी, सेजल आणि योहान दोघेही सिक्रेट लपवतात आणि एक धोका पत्करतात ज्यामुळे दोघांच्या नात्यात दूर निर्माण होऊ लागतो. अश्विनी यार्डच्या विनी यार्ड प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली या शोची निर्मिती करण्यात आली आहे. या शोमध्ये अयुब खान, शोभा खोटे, भावना बलसावार यांसारख्या व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहेत.


Nagarjuna : दाक्षिणात्या सुपरस्टार नागार्जुनने जंगल घेतलं दत्तक