Kareena Kapoor Omicron Test: करिनाला ओमिक्रॉनची लागण? डॉक्टरांनी दिली माहिती

करिनाला ओमिक्रॉनची कोणतीही लक्षणे नव्हती मात्र तरिही जीनोम सीक्वेंसिंग टेस्ट करण्यात आली होती.

kareena kapoor khan tested omicron negative
Kareena Kapoor Omicron Test: करिनाला ओमिक्रॉनची लागण? डॉक्टरांनी दिली माहिती

करण जोहरच्या पार्टीत अभिनेत्री करिना कपूर खानची आधी कोरोनाची लागण झाली. करिनाला कोरोनाची सौम्य लक्षणे होती त्यामुळे करिनाला घरीच क्वारंटाइन करण्यात आले. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर करिनाची ओमिक्रॉन चाचणी करण्यात आली होती. मात्र करिनाचे ओमिक्रॉन रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. करिनाला ओमिक्रॉनची कोणतीही लक्षणे नव्हती मात्र तरिही जीनोम सीक्वेंसिंग टेस्ट करण्यात आली होती. सुदैवाने करिनाला ओमिक्रॉनची लागण झालेली नाही.

करिनाला होम क्वारंटाइन होऊन १२ दिवस झाले आहेत. १२ व्या दिवशी करिनाने तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. करिनाने सेल्फी काढत लिहिले आहे, पायजमा,लिपस्टिक आणि एक पाउट. फार चांगले कॉम्बिनेशन आहे. नक्की ट्राय करा’ या पोस्टनंतर करिना रिकव्हर होत असल्याचे समजते आहे. करिनानाने तिच्या पुढच्या पोस्टमध्ये तिच्या हेल्थ विषयी अपडेट दिल्या आहेत. करिनाने म्हटले आहे, मी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की आपण कोरोनाच्या काळात आहोत की नाही? क्वारंटाइन संपण्यासाठी केवळ २ दिवस बाकी आहेत. सगळ्यांनी सुरक्षित रहा.

कभी खुशी कभी गम या सिनेमाला २० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निर्माता करण जोहरने एक पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीत करिना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर पार्टीतील महीप कपूर,सीमा खान यांना देखील कोरोनाची लागण झाली. तर मलायका अरोरा, आलिया भट्ट आणि करण जोहर यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्याचप्रमाणे महीप कपूर यांच्या संपर्कात आल्याने शनाया कपूरला देखील कोरोनाची लागण झाली.


हेही वाचा –  बिग बी अमिताभ बच्चन यांचे दाऊद इब्राहिमसोबत कनेक्शन? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य