Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन 'सीतेच्या'भूमिकेसाठी करीनाने मागितले तब्बल12कोटी रुपये!निर्मात्याला फुटला घाम

‘सीतेच्या’भूमिकेसाठी करीनाने मागितले तब्बल12कोटी रुपये!निर्मात्याला फुटला घाम

 नुकतच करीनाने एक चित्रपट साईन करण्यासाठी  भली मोठी रक्कम आकारली आहे. अशी माहिती समोर आली आहे.

Related Story

- Advertisement -

चित्रपटसृष्टीत अनेकदा असे आढळून येते की एखाद्या अभिनेत्रीचे लग्न झाल्यानंतर किंवा जास्तीत जास्त एखादं मूल झाल्यानंतर त्यांच्या फिल्मी करियरवर फूल स्टॉप लागतो पण बॉलिवूडच्या बेबो म्हणजेच करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) सारखी अभिनेत्री याला  अपवाद ठरली आहे. बेबोचा जलवा आजही कायम आहे. तिच्याकडे येणार्‍या सिनेमाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. करीना नेहमीच चित्रपटाच्या शूटिंग मध्ये किंवा प्रमोशनमध्ये कमालीची व्यस्त असते.  नुकतच करीनाने एक चित्रपट साईन करण्यासाठी  भली मोठी रक्कम आकारली आहे. अशी माहिती समोर आली आहे.बहुचर्चित चित्रपट तसेच बिग बजेट आणि मोठ्या स्केलवर चित्रित होणारा आगामी सिनेमा ‘सीता’ मध्ये करीना ‘सीतेच्या’ भूमिकेत झळकणार असल्याचे कळतेय.  तसेच संपूर्ण सिनेमा ‘सीता’ यांच्या जीवनातील  संघर्ष,लढाई,प्रेम याच दृष्टीकोनातून दाखवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alaukik Desai (@alaukikdesai)

- Advertisement -

या सिनेमाच्या घोषनेनंतर अनेक अभिनेत्रींच्या नावांची यादी समोर आली होती आणि आता या शर्यतीत करीना कपूर खानचे  (Kareena Kapoor Khan) नाव जोडण्यात आले आहे. माहीतीनुसार करीनाने या सिनेमामध्ये काम करण्यासाठी 12 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

बॉलीवुड हंगामाच्या वृत्तानुसार करीनाला सिनेमाची स्क्रिप्ट पसंत पडली आहे. आणि या सिनेमात  काम करण्यासाठी  तिने तब्बल 12 कोटी रुपये फिज आकारली आहे. अद्याप सिनेमात करीनाची वर्णी लागली आहे की नाही याची अधिकृत माहिती समोर आली नाहीये.  सध्या करीना अनेक चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. तिच्याकडे आधीच सिनेमाची लिस्ट असल्यामुळे  ”सीता’ या सिनेमात  करीना दिसणार की नाही हे अद्याप कळू शकले नाहीये.


- Advertisement -

हे हि वाचा – The family man 2नंतर मनोज वाजपेयीचा नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार हटके अंदाज

- Advertisement -