करीनाच्या चाहत्यांसाठी खुशखबर…

प्रसिद्ध बाॅलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानने नुकतीच इंस्टाग्रामवर एंट्री केली असून काही वेळातच तिचे लाखाे फाॅलोवर्स झाले आहेत.

kareena kapoor khans entry on instagram shared her first post
करीनाच्या चाहत्यासाठी खुशखबर...

आजकाल सोशल मीडियावर सर्वच जण अॅक्टीव्ह असतात. त्यात बाॅलीवूड कलाकारही मागे नाहीत. आपल्या फिल्मचं प्रमोशन असो किंवा काही खास क्षण असो, सर्व कलाकार आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करुन आपल्या चित्रपटांबद्दल सांगत असतात. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॅार्मवर या सिनेतारकांचे लाखो फॅालोवर्स आहेत. त्यात आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे, या अभिनेत्रीचं नाव आहे करीना कपूर खान. होय, करीना आता अधिकृतपणे इंस्टाग्रामवर आली असून @kareenakapoorkhan हे तिचे यूजरनेम आहे. या अकाऊंटवरुन तिने दोन पोस्टही शेअर केल्या आहेत. यात पहिल्या पोस्टमध्ये तिने एक व्हिडीओ टाकला असून त्याला ‘coming soon’ असे कॅप्शन दिले आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने स्वतःचा फोटो टाकून त्याला ‘The cat’s out of the bag’ असे कॅप्शन दिले आहे. करीनाच्या या अकाऊंटवर काही तासांतच ७ लाखांपेक्षा जास्त फॅालोवर्स झाले असून त्यात झपाट्याने वाढ होत आहे. मात्र करीनाने तिच्या अकाऊंटवरुन अजूनपर्यं तरी कोणालाही फाॅलो केलेले नाही.

 

View this post on Instagram

 

The cat’s out of the bag. #HelloInstagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

करीनाच्या नावाने सोशल मीडियावर अनेक फॅन क्लब पेजेस् आहेत, अनेक चाहते मिळून हे पेज चालवतात. मात्र करीनाचे याआधी कोणतेही अधिकृत पेज नव्हते. आता इंस्टाग्रामवरील या नव्या पेजवर करीनाच्या चित्रपटांचे ताजे अपडेट्स पहायला मिळतील. त्यामुळे करीनाच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब आहे.