घरमनोरंजनNawab No 2! चिमुकल्यासह करिनाने शेअर केला फोटो; नेटिझन्स म्हणाले...

Nawab No 2! चिमुकल्यासह करिनाने शेअर केला फोटो; नेटिझन्स म्हणाले…

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नेहमीच सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असते. करीना-सैफअली खान यांचा पहिला मुलगा तैमूर यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. मात्र करीनाने दुसऱ्यांदा बाळाला जन्म दिल्याने तिच्यावर सोशल मीडियावर शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसतोय. या छोट्या नवाबाच्या आगमनानंतर पहिल्यांदाच करीना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे दिसते. नुकताच करीनाने तिचा एक फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या छोट्या नवाबाच्या जन्मानंतर नेटिझन्ससह चाहते देखील या नव्या पाहुण्याचा फोटो पाहण्यास उत्सुक होते. मात्र चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली की नाही हे तरी अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र करीनाने शेअर केलेल्या फोटोवरून असे दिसते की सध्या करीना तैमूर आणि हा नवा पाहुणा तिघेही एन्जॉय करताना दिसताय. दरम्यान करीनाचा हा फोटो पाहून चाहतेही गोंधळात पडल्याचे त्यांच्या कमेंटवरून दिसतेय.

- Advertisement -

करीनाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये दिसणारा चिमुरडा हाच तैमूरचा छोटा भाऊ तर नाही न? असा सवाल चाहत्यांना पडला आहे. यासह छोटे नवाब हेच का असा प्रश्न देखील या शेअऱ केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी विचारल्याचे दिसते. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून हा चिमुकलाच तैमूरचा भाऊ असल्याचं अनेकांना वाटतेय. या व्हायरल होणाऱ्या फोटोंवर नेटीझन्सने लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे.

- Advertisement -

करीना आणि सैफचा पहिला मुलगा तैमूर अली खान (Taimur Ali Khan) हा एक लोकप्रिय स्टार किड आहे. त्यामुळे तैमूरनंतर सैफच्या घरी येणार चिमुरड्याची सगळ्यांना प्रतिक्षा होती, यादरम्यानच गेल्या काही दिवसांपूर्वी करीनाने आपल्या येणाऱ्या बाळाबाबत एक मोठा खुलासा केला होता. आपल्या लोकप्रिय टॉक शो ‘व्हॉट व्हूमन वॉन्ट’ (What Women Want)च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये करीनाने आपल्या येणाऱ्या बाळाबाबत बोलली होती. यावेळी करीनाने होणाऱ्या बाळाबाबत खुलासा केला होता तर दुसऱ्या मुलाच्या नावाबाबत प्रश्न विचारला असता त्यावेळी करीनाने स्पष्टपणे सांगितले की, ‘मी आणि सैफने ठरवले की, जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो आपण तेव्हाच घेऊ आणि सर्वांना सरप्राईज देऊ.’


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -