घरताज्या घडामोडीKareena kapoor: कोविडचे नियम सांभाळत करिना सैफची कॉफी डेट, पहा फोटो

Kareena kapoor: कोविडचे नियम सांभाळत करिना सैफची कॉफी डेट, पहा फोटो

Subscribe

सैफ करिनाच्या तब्येतीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे

बॉलिवूडचे रॉयल कपल सैफ अली खान आणि करिना कपूर अनेक वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करतायत. असे म्हणतात लग्न झाल्यावर नवरा बायकोमधील प्रेम कमी होत मात्र सैफिनाचे प्रेम आणखी वाढत चालले आहे. दोघांचे एकमेकांवर असलेले प्रेम करिनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून दाखवून दिले आहे. करिनाला कोरोनाची लागण झाल्याने ती सध्या क्वारंटाइन आहेत त्यामुळे दोघेही एकमेकांपासून लांब आहेत. मात्र सैफ करिनाच्या तब्येतीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे. क्वारंटाइन असलेल्या करिनाने आणि सैफने कोरोनाचे नियम पाळत कॉफी डेट देखील केली. करिनाने तिच्या कॉफी डेटचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले.

सैफ अली खान दूर राहून देखील बायकोची कशी काळजी घेत आहे हे करिनाने तिच्या पोस्टमध्ये सांगितलं. फोटोमध्ये सैफ अली खान त्याच्या घराच्या समोरच्या इमारतीच्या गच्चीवर हातात कॉफीचा मग घेऊन उभा आहे. तर करिना तिच्या घराच्या रुममधून सैफला पाहत आहे. फोटोत करिना कॅमेराच्या मागे असल्याने दिसत नाहीये. करिनाने पोस्टमध्ये असे म्हटेल आहे की, आज कोरोनाचे सावट असले तरीही आपण एकमेकांवर आधी इतकचं प्रेम करतो हे विसरुन चालणार नाही. नेटकऱ्यांनी करिनाने शेअर केलेला फोटो पाहून सैफीनाची कॉफी डेट झाली असे म्हटले आहे.

- Advertisement -

सैफ सध्या करिनाच्या तब्येतीची विशेष काळजी घेत आहे. सतत तो डॉक्टरांकडून अपडेट घेत असतो. फोटोमध्ये सैफ इमारतीच्या गच्चीत उभा पाहून कॉफी पिताना दिसत आहे. सैफच्या बाजूला त्याचे बॉडीगार्ड मास्क घालून उभे आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, करिना कोरोना पॉझिटिव्ह आली तेव्हा सैफ मुंबईबाहेर होता. करिना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच तो घरी आलाय.

- Advertisement -

करिना कपूर आणि तिची खास मैत्रीण अमृता अरोरा या दोघींना करण जोहरने आयोजित केलेल्या एका पार्टीत कोरोनाची लागण झाली. अमृता आणि करिना सध्या होम क्वारंटाइन आहेत. मुंबई पालिकेकडून दोघींच्या इमारती सील करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – संजय कपूर आणि मुलगी शनाया कपूर यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -