Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन तैमूरसारखाच क्यूट आहे करीनाचा दुसरा मुलगा, अनसीन फोटो व्हायरल

तैमूरसारखाच क्यूट आहे करीनाचा दुसरा मुलगा, अनसीन फोटो व्हायरल

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खानचा पहिला मुलगा तैमर आता एक सेलिब्रिटी किट्समधील स्टार झाला आहे. त्यामुळे तैमुर सतत माध्यमांतचे लक्ष वेधून घेत असतो. तैमुरमुळे माध्यमांच्या जमाणाऱ्या गर्दीने करिना आणि सैफ देखील आता वैतागले आहेत. तैमुरला या गर्दीपासून दूर ठेवणे अनेकदा करिनालाही अवघड जाते. मात्र या अनुभवातून करीना-सैफने धडा घेत दुसरा मुलगा जेहला माध्यमांपासून दूर ठेवणेच पसंत केले आहे.

अद्याप करिनाच्या गोंडस जेहचे कोणतेही फोटो माध्यमांसमोर आले नाहीत. परंतु करिना किती दिवसं जेहला माध्यमांपासून लपून ठेवणार हा प्रश्न आहे. अशातचं जेह आणि तैमूरची कधीही पाहिलेले काही नवीन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील लहानं मुलं तैमुर आणि त्याचा धाकटा भाऊ जेह असल्याचा दावा केला जात आहे.

- Advertisement -

करीना कपूर खानच्या इंस्टा फॅनक्लब हे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये करीना कपूर आपल्या दोन्ही मुलांसोबत खेळताना दिसतेय. पहिल्या फोटोमध्ये करिनाच्या मांडीवर पुस्तक घेऊन बसलेला तैमुर असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसऱ्या फोटोत तैमुरचा धाकडा भाऊ जेह असल्याचा दावा केला जात आहे. या फोटोत करीना जेहच्या कपाळावर किस करत त्याचे आई -मुलाचे अद्भुत नाते दर्शवत आहे.

- Advertisement -

फोटोमध्ये करीनाबरोबर दिसणारा खरोखरंच जेह असेल तर तोही थोरला भाऊ तैमूरसारखा खूपच गोंडस आणि मोहक आहे.असे म्हणावे लागेल. सध्या या फोटोंवर कंमेंट्स आणि लाईक्सचा पूर आला आहे. चाहत्यांना हे दोन्ही फोटो खूपचं आवडलेले दिसतायंत. यापूर्वी करीना कपूरने आपल्या इंस्टावर जेहची दोन छायाचित्रे शेअर केली होती. पण त्यामध्ये जेहचा चेहरा दिसला नाही.

करीनासोबत तिच्या दोन्ही मुलांचे हे फोटो तिच्या प्रेग्नन्सी बुकचा एक भाग असतील असे म्हटले जात आहे. या बुकमध्ये करीनाचे तिच्या मुलांबरोबरचे आणखी बरेच न पाहिलेले फोटो चाहत्यांना पाहयला मिळणार आहे. परंतु करीनाच्या या बुकच्या नावावरून आता वाद निर्माण झाले आहे. करीनाने तिच्या प्रेग्नंसी बुकचे नाव बायबल असे ठेवले आहे. नाववरून करीनावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आले आहेत. ख्रिश्चन समुदायाने यावर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे करीनाविरोधात आता तक्रारही दाखल करण्यात आली आहे.


Param Sundari title track : ‘मिमी’ सिनेमाच्या ‘परम सुंदरी’ गाण्यात दिसणार क्रिती सेनॉनचा ‘देसी’ अंदाज


 

- Advertisement -