Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन करिना कपूरने घातला चक्क २६ हजार रुपये किमतीचा मास्क

करिना कपूरने घातला चक्क २६ हजार रुपये किमतीचा मास्क

सध्या सोशल मिडियावर अभिनेत्री करिना कपूर खानने घातलेल्या मास्कची जोरदार चर्चा चालू आहे.करिनाच्या या महागड्या मास्क घातलेल्या पोस्टमुळे चाहते भलतेच आश्चर्य चकीत झाले आहेत.

Related Story

- Advertisement -

सेलिब्रिटींच्या प्रत्येक गोष्टींची चर्चा सोशल मिडियावर झपाटयाने व्हायरल होत असते. त्यांनी केलेल्या प्रत्येक पोस्टवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतो. सध्या सोशल मिडियावर अभिनेत्री करिना कपूर खानने घातलेल्या मास्कची जोरदार चर्चा चालू आहे. करिनाने चक्क २६ हजार रुपयांचा मास्क घातला आहे. करिनाच्या या महागड्या मास्क घातलेल्या पोस्टमुळे चाहते भलतेच आश्चर्य चकीत झाले आहेत.

 

- Advertisement -

सध्या जगभरामध्ये कोरोना व्हायरचा प्रसार वेगाने होत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. शासनाने आखून दिलेले नियम व अटिंच पालन प्रत्येकाला कराव लागतय. अशातच अभिनेत्री करिना कपूर ने सोशल मिडियावर मास्क घालून फोटो शेअर केला आहे. तसेच ”कोणत्याही प्रकारचा प्रचार नाहिये,फक्त मास्क घाला” असं कॅप्शन लिहून लोकांना मास्क घालण्यासाठी आवाहन देखिल केलय. पण करिनाने कोणताही साधा सुधा मास्क घातला नसुन लूई वीटॉन या ब्रांन्डचा हा मास्क आहे. हा मास्क एका सिल्क पाऊच मध्ये मिळतो. या ब्रांन्डच्या वेबसाइट वर या मास्कची किंमत $355 डॅालर इतकि आहे. तसेच भारतीय किमतीमध्ये याचे रुपांतर केले असता याचे मुल्य २५ हजार ९९४ रुपये इतके आहे.

- Advertisement -

करिना सोशल मिडियावर बरीच ऑक्टीव असते.तसेच वर्क्रफंटबाबत सांगायचे झाल्यास करिना अमिर खान सोबत ”लाल सिंह चड्ढा” या आगामी चित्रपटात दिसणार आहे.


हे हि वाचा – रणधीर कपूर यांच्याकडून करिनाच्या दुसऱ्या बाळाचे फोटो व्हायरल

- Advertisement -