करीनाच्या सौंदर्याचे आहे ‘हे’ रहस्य

kareena kapoors summer essentials include these 3 things
करीनाच्या सौंदर्याचे आहे 'हे' रहस्य

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व लोक घरी राहून आपली जास्तीत जास्त काळजी घेतल आहेत. या लॉकडाऊन दरम्यान महिला देखील त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक घरगुती उपाय करत आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूड अभिनेत्री देखील नैसर्गिक उत्पादनांचा वापर करून सौंदर्याची काळजी घेत आहेत. यामध्ये बॉलिवूड बेवो म्हणजेचे अभिनेत्री करीना कपूर देखील सौंदर्याची काळजी घेताना दिसत आहे.

नुकतीच करीनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने  घरगुती फेसपॅक तयार करू चेहऱ्याला लावल्याचे दिसत आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून करीना कपूर मेकअपशिवाय दिसली आहे. अशा परिस्थितीत आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय करत आहे.

सोशल मीडियावर करीन सध्या खूप सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. अभिनेता सैफ-अली-खानने घरी राहून केलेल्या कलाकृतीचा फोटो देखील करीनाने शेअर केला आहे.

तसंच यादरम्यान करीना मुलगा तैमुर अली खानसोबत मस्ती करताना दिसत आहे. मदर्स डे निमित्ताने करीनाने तैमुरसोबतचा एक फोटो शेअर केला होता. तैमुर आणि करीनाच्या या फोटोला १० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

करीनाने काही दिवसांपूर्वी पिंपल आल्यानंतरचा देखील फोटो शेअर केला आहे. अशा प्रकारे मेकअॅप नसलेले फोटो करीना शेअर करताना दिसत आहे.


हेही वाचा – Video: बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका म्हणाली, माणसाला प्राण्यांपासून वाचण्याची गरज नाही तर…