घरमनोरंजनkareena kapoor-करिना कपूर, अमृता अरोरासह अन्य दोनजणींची आता ओमीक्रॉन चाचणी

kareena kapoor-करिना कपूर, अमृता अरोरासह अन्य दोनजणींची आता ओमीक्रॉन चाचणी

Subscribe

बॉलीवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करिना कपूर, अमृता अरोरा हीच्यासह चार अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. निर्माता करण जोहर याने दिलेल्या पार्टीत करिना आणि तिच्या मैत्रीणी गेल्या होत्या. त्यानंतर करिनाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. पण आता या सगळ्यांची ओमीक्रॉन चाचणीही होणार आहे.

करिनाबरोबरच अमृता, महिप कपूर, सीमा खान यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. या चारही जणी होम क्वारनटाईन असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत. मात्र आता कोरोनाच्या डेल्टाहून अधिक संसर्गजन्य असलेल्या ओमीक्रॉनचा मुंबईतही शिरकाव झाल्याने खबरदारी म्हणून या चारही मैत्रिणींचे नमुने ओमीक्रॉन चाचणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. येत्या चार दिवसात याचा रिपोर्ट मिळणार असून त्यानंतर या चौघींना ओमीक्रॉन झालाय का हे कळणार आहे. यामुळे बॉलीवूडच नाही तर या तारकांचे चाहतेही चिंताग्रस्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -