बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नेहमीच तिच्या कुटुंबासोबतचे व्हेकेशनदरम्यानचे फोटो शेअर करत असते. सध्या करीना पती सैफ अली खान आणि तिची दोन्ही मुलं तैमूर आणि जेह अली खानसोबत लंडनमध्ये आहे. यादरम्यानचा एक फोटो करीनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. जो पाहून चाहते फोटोवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत.
करीनाने शेअर केला कुटुंबासोबतचा सुंदर फोटो
View this post on Instagram
करीना कपूरने मंगळवारी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये करीनासोबत पती सैफ अली खान आणि तिची दोन्ही मुलं तैमूर आणि जेह अली खान हॉटेलमध्ये नाश्त्या करताना दिसत आहेत. या फोटोखाली करीनाने लिहिलंय की, “2023 च्या आमचा नाश्ता रंगीबेरंगी व्हावा अशी आमची इच्छा आहे.”
करीना कपूरचे आगामी चित्रपट
करीना कपूर यापूर्वी अमीर खानसोबत लाल सिंह चड्ढा या चित्रपटात दिसली होती. आगामी काळात ती कृती सेनन, तब्बू आणि दिलजीत दोसांझ यांच्यासोबत ‘द क्रू’ चित्रपटात दिसणार आहे. एकता कपूर आणि रिया कपूर एकत्र हा चित्रपट बनवत आहेत. राजेश कृष्णन दिग्दर्शित ‘द क्रू’ या चित्रपटासाठी करिना कपूरने नुकतेच गोव्यात शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटाशिवाय करीना कपूर, विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्यासोबत काम करताना दिसणार आहे. त्याचवेळी सैफ अली खान ‘आदिपुरुष’ चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसला होता आणि या चित्रपटाबाबत बराच वाद सुरू आहे. सैफ अली खान आता ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूरसोबत साऊथच्या ‘देवरा’ चित्रपटात काम करताना दिसणार आहे.
हेही वाचा :