कारगिल विजय दिवसा निमित्ताने ”या” बॉलीवुड स्टार्सने दिली श्रद्धांजली

भारतीय सैन्याचं शौर्याचं प्रतीक कारगिल युद्धाला आज २२ वर्ष पूर्ण झाली आहेत. कारगिल विजय दिवसाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त बॉलीवूड स्टार्स अक्षय कुमार, फरहान अख्तर, रकुल प्रीत सिंह,अभिषेक बच्चन यांनी कारगिल युध्दामध्ये शहीद झालेल्या सैन्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

अक्षय कुमारने ट्विट करत शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. त्याने त्याच्या ट्विटमधे म्हटले ”मी आपल्या त्या वीरांच स्मरण करतो ज्यांनी बहादुरीने युद्ध लढून आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा शूर सैन्यांना माझा सलाम.”

अभिनेता फरहान अख्तर याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले ” भारतीय सैनिकांबद्दल मला आदर आहे. आपल्या देशासाठी त्यांनी बलिदान दिले, अशक्य गोष्टी शक्य केल्या.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिने ट्विटमधून ”भारतीय सैन्यांना सलाम करते, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. जय हिन्द

अभिनेता अभिषेक बच्चन ने ट्विट केले

कारगिल युध्दातील शहीद जवानांच्या बलिदानाचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आमच रक्षण केल्याबद्दल आणि आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी धन्यवाद !