Karma! जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकार सोबत झालं…आरोह वेलणकरची पोस्ट चर्चेत

या ट्विटमध्ये आरोह वेलणकरने लिहिलंय की, "महाराष्ट्राची जनता जिंकली" आरोहच्या या ट्विटवरून अनेकजण त्याला पाठिंबा देत आहे, तर काही जण त्याला ट्रोल देखील करत आहेत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार यांनी बंड केल्यामुळे राज्यात गेल्या अनेक दिवसापासून राजकीय पेच निर्माण झाली होती. महाविकास आघाडी सरकारकडे पुरेसं पाठबळ नसल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा जाहीर केला. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजप नेते सेलिब्रेशन करत आहेत. या सर्व प्रकरणावर अनेक माध्यमातून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारही आपलं मत मांडत आहेत.

मराठी मनोरंजन सृष्टीतील दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता आस्ताद काळे, अभिनेता हेमंत ढोमे यांच्या प्रतिक्रियेनंतर आता अभिनेता आरोह वेलणकरने सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. आरोह वेलणकर अनेकदा सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर मांडत असतो. दरम्यान, आता त्याने उद्धव ठाकरेंच्या राजीनंतर त्याने एक ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये आरोह वेलणकरने लिहिलंय की, “महाराष्ट्राची जनता जिंकली” आरोहच्या या ट्विटवरून अनेकजण त्याला पाठिंबा देत आहे,तर काही जण त्याला ट्रोल देखील करत आहेत. या ट्विट व्यतिरिक्त आरोहने अजून एक ट्विट केलंय. ज्यात त्याने एक खूप जुन्या वर्तमानपत्राचा फोटो शेअर केला आहे. त्या वर्तमानपत्रासोबत आरोहने, “Karma! जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकार सोबत झालं….” आरोहच्या या पोस्टवरून अनेकजण त्याला ट्रोल करत आहेत.

त्यातील एकाने कमेंटमध्ये लिहिलंय की, “समाज आणि तुझी लवकर गाठभेट घडो ही सदिच्छा..!” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “साहेबांनी स्वतःच्या जीवावर फोडले होते आमदार ..ED, CBI मागे लावून फडणवीस सारखे नव्हते केले…” सध्या आरोहची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. अनेकजण त्याला या पोस्टवरून ट्रोल करत आहेत.

 


हेही वाचा :मुख्यमंत्री म्हणून अलविदा म्हणताना वाईट वाटतंय… उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर हेमंत ढोमेची भावनिक पोस्ट