कर्नाटकच्या सिनी शेट्टीने पटकावला ‘मिस इंडिया 2022’ होण्याचा मान

या तगड्या कॉम्पीटीशनमध्ये सिनी शेट्टी हिने बाजी मारली असून ३१ सौंदर्यवतींना मागे टाकत सिनी शेट्टीने मिस इंडिया होण्याचा मान पटकावला झाली

या वर्षीचा मिस इंडिया २०२२ (Miss India 2022) चा किताब कर्नाटकच्या सिनी शेट्टी मिळवला आहे. रविवार ३ जुलै रोजी मुंबई येथे पार पडलेल्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये मिस इंडिया २०२२ चा ग्रँड फिनाले संपन्न झाला. या तगड्या कॉम्पीटीशनमध्ये सिनी शेट्टी हिने बाजी मारली असून ३१ सौंदर्यवतींना मागे टाकत सिनी शेट्टीने मिस इंडिया होण्याचा मान पटकावला झाली. गेल्या अनेक दिवसांपासून सिनी या कॉम्पीटीशनसाठी मेहनत घेत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Femina Miss India (@missindiaorg)

नेहमी प्रमाणेच यावर्षी सुद्धा मिस इंडिया ही स्पर्धा खूप कठीण होती. शिवाय ही स्पर्धमध्ये निवड करण्यासाठी ६ जज उपस्थित होते. यावेळी जज म्हणून मलाइका अरोरा, नेहा धूपिया, डीनो मोरिया, राहुल खन्ना, रोहित गांधी आणि शामक डाबर हे सहभागी होते. या व्यतिरिक्त बॉलिवूडमधील इतर कलाकरांनी सुद्धा या कार्यक्रमात हजेरी लावली होती. मिस इंडिया २०२२ ची विजेती म्हणून ३१ सौंदर्यवतींपैकी सिनी शेट्टीची निवड करण्यात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Femina Miss India (@missindiaorg)

तसेच मिस इंडिया २०२२ मध्ये राजस्थानच्या रूबल शेखावतची मिस इंडिया २०२२ फर्स्ट रनरअप म्हणून निवड करण्यात आली तर, उत्तर प्रदेश मधील शिवाता चौहान हिची मिस इंडिया २०२२ सेकेंड रनरअप म्हणून निवड झाली.

मिस इंडिया २०२२ झालेली सिनी शेट्टी मूळची कर्नाटकची आहे. मात्र तिचं बालपन मुंबईमध्ये गेलं. सिनीचं नुकतीच पदवीधर झाली असून ती CFA चा अभ्यास सुद्धा करत आहे.याशिवाय ती एक उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना सुद्धा आहे. सिनी शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

 


हेही वाचा :प्राजक्ता माळीच्या पावसाळी ट्रिपची सोशल मीडियावर चर्चा, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स