Tandav Controversy: ‘पद्मावत’नंतर करणी सेनाचं ‘तांडव’बाबत धक्कादायक वक्तव्य

महाराष्ट्र करणी सेनाचे प्रमुख अजय सेंगर यांनी याबाबत माहिती दिली.

Karni Sena Offers Rs 1 Crore For ‘Slitting Tongue' Of Those Insulting Hindu Gods
Tandav Controversy: 'पद्मावत'नंतर करणी सेनाचं 'तांडव'बाबत धक्कादायक वक्तव्य

Amazon Primeवरील सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेली ‘तांडव’ (Tandav) वेबसीरिजच्या निर्मात्याने जरी माफी मागितली असली तरी वाद शमण्याचे काही चिन्ह दिसत नाही आहे. देशातील अनेक भागात या वेबसीरिजच्या निर्माता-दिग्दर्शकासह सीरिजमधल्या कलाकारांविरोधात आंदोलन केली जात आहेत. तसेच सीरिज संबंधित अनेक लोकांविरोध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता महाराष्ट्र करणी सेनाने सांगितले आहे की, ‘ज्याने कोणी हिंदू देवीदेवातांचा अपमान केला आहे, त्याची जीभ कापणाऱ्याला १ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.’

‘तांडव’ वेबसीरिजचा वाद चिघळला असून या वेबसीरिजमधील आक्षेपार्ह सीनमुळे अनेक प्रेक्षकांनी वेबसीरिजकडे पाठ फिरवली आहे. महाराष्ट्र करणी सेनाचे प्रमुख अजय सेंगर यांनी ‘तांडव’ वेबसीरिजवर आक्षेप नोंदविला आहे. ते म्हणाले की, ‘ज्याने पण सीरिजमध्ये हिंदू देवीदेवातांची अपमान केला आहे. त्याची जीभ कापणाऱ्याला १ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.’ अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar)च्या या वेबसीरिजविरोधातील वाद वाढत आहे. अजय सेंगर पुढे म्हणाले की, ‘जरी ‘तांडव’च्या निर्मात्याने सर्वांची माफी मागितली असली तरी हे पुरेसे नाही आहे आणि याचा स्वीकारल केला जाणार नाही.’

‘तांडव’ वेबसीरिज विरोधात जयपुरमध्ये करणी सेनाच्या लोकांनी अनोखे आंदोलन केले. तिथे महिल्यांनी या आंदोलनात भाग घेतला. महिलांनी या आंदोलनात गाढवाच्या चेहऱ्यावर वेबसीरिजमधील कलाकारांचा आणि दिग्दर्शकाचा पोस्टर लावला होता आणि त्यांना गुलाब जामून खायला घातले. त्यावेळी महिला म्हणाल्या की, ‘आता तरी सुधरा. आता मिठाई खाऊ घातली आहे, तो दिवस लांब नाही आहे, जेव्हा असे प्रकारे करणाऱ्या बॉलिवूडच्या लोकांना चपलांनी मारले जाईल.’

यापूर्वी लखनौच्या हजरतगंज कोतवालीमध्ये Amazon Primeच्या ओरिजिनल कंटेंटच्या इंडिया हेड अपर्ण पुरोहित, वेबीसीरिज दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माता हिमांशु कृष्ण मेहरा, लेखक गौरव सोलंका आणि इतर कलाकारांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी (hurting religious sentiments) तक्रार दाखल केली आहे. शिवाय मुंबईत वेबसीरिजच्या संबंधित ५ लोकांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये दिग्दर्शन अली अब्बास जफर, हिमांशु मेहरा, गौरव सोलंकी, अपर्णा पुरोहित आणि अमित अग्रवाल विरोधात आयपीसी कलम १५३ (A), २९५ (A), ५०५ अंतर्गत भाजप आमदार राम कदम यांनी तक्रार दाखल करण्यात आली आहे.


हेही वाचा – शेतकऱ्यांनी जान्हवी कपूरच्या चित्रपटाची थांबवली शूटिंग!