घर ताज्या घडामोडी पोलंडच्या कॅरोलिना बीलॉवस्काने जिंकला Miss World 2021 चा किताब

पोलंडच्या कॅरोलिना बीलॉवस्काने जिंकला Miss World 2021 चा किताब

Subscribe

मिस वर्ल्डच्या या शर्यतीत भारताच्या वाराणसीमधील मानसा देखील सहभागी झाली होती परंतु मानसा टॉप १३मधून बाहेर आली

पोर्तो रिको येथे ७०वी मिस वर्ल्ड २०२१ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पोलंडची कॅरोलिना बिलावस्का हिला २०२१ची मिस वर्ल्ड म्हणून निवडण्यात आले. पोर्तो रिकोया सॅन जुआन येथील कोका कोला म्युझिक हॉलमध्ये कॅरोलिनाच्या डोक्यावर मिस वर्ल्डचा क्राऊन घालण्यात आला. कॅरोलिनाला मिस वर्ल्ड २०२१ची विजेती तर युनायटेड स्टेट्सची सैनीची प्रथम उपविजेती म्हणून निवड करण्यात आली. तर कोटे डीआयव्हरी येथील ऑलिव्हिया येसेसची द्वितीय उपविजेती ठरली.

मिस वर्ल्डच्या या शर्यतीत भारताच्या वाराणसीमधील मानसा देखील सहभागी झाली होती परंतु मानसा टॉप १३मधून बाहेर आली. टॉप ६मध्ये तिची निवड झाली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Miss World (@missworld)

- Advertisement -

कोण आहे कॅरलिना बिलावस्का ?

- Advertisement -

मिस वर्ल्ड ऑर्गनाझेशनने दिलेल्या माहितीनुसार, कॅरलिना बिलावस्का सध्या मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. त्याचप्रमाणे तिचा पीएचडीचा अभ्यास देखील सुरू आहे. ती एक मॉडेल म्हणून काम करते त्याचप्रमाणे तिला एक वक्त म्हणून काम करायला देखील आवडते. स्कूबा डायव्हिंग आणि पोहणे हे तिचे आवडते खेळ आहेत.

मिस वर्ल्ड ऑर्गनाझेशनने त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कॅरलिना बिलावस्का शुभेच्छा देत ती स्वयंसेवी कार्यात सहभागी असल्याचे नमूद केलं आहे. त्याचप्रमाणे ती ब्युटी विथ पर्पज पोजेक्ट, संकटात बेघरांना मदत करणे, त्यांच्या समस्येबद्दल जनजागृती करणे यासारखी कामे ती करते.

तसेच ती दर रविवारी पोलंडमधील ओस शहरातील जवळपास ३०० गरजू लोकांना अन्न, पाणी, कपडे, कायदेशीर सल्ले, व्यावसायिक वैद्यकिय मदत करते.


हेही वाचा – Holi 2022 : कतरिना ते अंकिता लोखंडे, ‘हे’ कलाकार सेलिब्रेट करणार लग्नानंतरची पहिली होळी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -