घरCORONA UPDATECoronaVirus - चॉकलेट बॉय कार्तिककडून 'पीएम फंडाला' एक कोटी!

CoronaVirus – चॉकलेट बॉय कार्तिककडून ‘पीएम फंडाला’ एक कोटी!

Subscribe

अक्षयने तब्बल 25 कोटी रुपयांची मदत केली आहे.

कोरोनामुळे देशाची आर्थिकस्थीती बिघडली आहे. सरकार वेगवेगळ्या प्रकारे ही आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना सरकार आखत आहेत. देशाचे नागरिकही आपल्यापरीने जमेल तशी सरकारला मदत करत आहे. आता सरकारच्या मदतीसाठी बॉलिवूडही पुढे सरसावलं आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने एक कोटी रुपयांची मदत ‘पंतप्रधान सहाय्यता निधी’ला केली आहे.

- Advertisement -

कार्तिकने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत ही बातमी सगळ्यांना दिली आहे. कार्तिक म्हणतो की, ‘राष्ट्र म्हणून एकत्र उभं राहण्याची गरज आहे. मी जो कोणी आहे, जो पैसा मी आतापर्यंत कमावला आहे, तो फक्त भारतातील जनतेमुळे. आपल्यासाठी मी ‘पंतप्रधान सहाय्यता निधी’ला एक कोटी रुपयांचे योगदान देत आहे. मी सर्व भारतीयांना आवाहन करतो, त्यांनी आपल्या परीने शक्य तितकी मदत करावी’

या आधी अनुष्का शर्मा, अक्षय कुमार, प्रभास, अल्लू अर्जुन, पवनकल्याण, कपिल शर्मा, वरुण धवन, करण जोहर, आयुषमान खुराना, गुरु रंधावा आणि टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांनीही ‘पंतप्रधान सहाय्यता निधी’ला देणगी दिली आहे. अक्षयने तब्बल 25 कोटी रुपयांची मदत केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -