कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’ने दहाव्या दिवशी कमावला इतक्या कोटींचा गल्ला

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा सध्या चर्चेत असलेला ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. जवळपास हा चित्रपट रिलीज होऊन 10 दिवस पूर्ण झाले आहेत. 10 दिवसाच्या कालावधीत या चित्रपटाने आतापर्यंत 100 करोड पेक्षा जास्त कमाई केली आहे.

‘भूल भुलैया 2’ ने केला 122 करोडचा टप्पा पार

अनीज बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया 2’ च्या 10 व्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटाने शनिवारी 11.35 करोडचा गल्ला जमवला होता. तसेच रविवारी म्हणजेच 10 व्या दिवशी 12.77 करोडची कमाई केली आहे. यासोबतच या चित्रपटचा एकूण कमाई आकडा 122.69 करोड इतका आहे. ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाआधी संजय लीला भंसाळीच्या गंगूबाई काठियावाडी आणि विवेक अग्निहोत्रीचा द कश्मीर फाइल्स सुद्धा 100 करोड्या यादीत सहभागी झाले होते.

सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा चित्रपट
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा ‘भुल भूलैया 2’ चित्रपट 2022 मधील सर्वात जास्त कमाई करणारा तिसरा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. तसेच अजय देवगणचा ‘रनवे 34’ , टायगर श्रॉफचा ‘हीरोपंती 2’ आणि कंगना रनौतचा धाकड यांसारखे चित्रपट फ्लॉप झाले आहेत. ‘भुल भूलैया 2’मध्ये कार्तिक आणि कियाराची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. या चित्रपटात तब्बू, संजय मिश्रा आणि राजपाल यादव यांसारखे अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.


हेही वाचा :अनुष्का शर्माने केली ‘Chakda Xpress’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात