घरमनोरंजनकार्तिकचा 'धमाका' चित्रपटाचा टिझर झाला प्रदर्शित

कार्तिकचा ‘धमाका’ चित्रपटाचा टिझर झाला प्रदर्शित

Subscribe

अभिनेता कार्तिक आर्यन याचा आगामी चित्रपट 'धमाका' चा टीझर प्रदर्शित झाला आहे. याबाबत कार्तिकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चित्रपटाचा टिझर शेअर करुन या चित्रपटाविषयी कल्पना दिली आहे.

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन हा लवकरच ‘धमाका’ या चित्रपटात झळकणार आहे. नेटफ्लिक्सच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर हा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कार्तिकच्या भूमिकेचे नाव अर्जून पाठक आहे. या चित्रपटाची पटकथा ही मुंबईवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधव यांनी केले आहे. २२ नोव्हेंबर २०२० रोजी कार्तिकच्या वाढदिवसानिमित्त ‘धमाका’ या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. या चित्रपटात कार्तिक सोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर ,अभिनेता विकास कुमार आणि विश्वजित मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर १९० देशांत प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

 कार्तिकने स्वत: सोशल मीडियावर या चित्रपटाचा टिझर शेअर करुन त्याच्या आगामी चित्रपटाची कल्पना दिली आहे. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने या चित्रपटाची झलक शेअर केली आहे. टीझरमध्ये कार्तिक एका न्यूज अॅकरच्या भूमिकेत दिसत आहे. टीझरच्या सुरुवातीला कार्तिक न्यूजरुम मध्ये बसून किंचाळतो आणि बंद करा हा कॅमेरा बंद करा. तो कोणत्या तरी शो साठी नकार देताना त्यात दिसत असतो..तर त्याचा एडिटर त्याला म्हणते, द शो मस्ट गो ऑन. व त्यावर कार्तिक बोलतो, मी हे नाही करु शकत. यानंतर कार्तिक स्वत: ला संभाळत कॅमेरा फेस करतो आणि बोलतो, मी आहे अर्जून पाठक भरोसा २४/७ मधून.. मी जे पण बोलन ते सत्य बोलेन” असे कॅप्शन कार्तिकने दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -