घरमनोरंजन‘सत्यप्रेम की कथा’मधील कार्तिक-कियाराच्या लग्नाचा सीन झाला लीक

‘सत्यप्रेम की कथा’मधील कार्तिक-कियाराच्या लग्नाचा सीन झाला लीक

Subscribe

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट ‘सत्यप्रेम की कथा’ 29 जून 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ हा एका प्रेमकथेवरील आधारित चित्रपट असून या चित्रपटाद्वारे कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी दुसऱ्यांदा एकमेकांसोबत पडद्यावर दिसणार आहेत. याआधी ते ‘भुलभूलैया 2’ मध्ये एकत्र दिसले होते. दरम्यान, सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून सोशल मिडियावर शूटिंगदरम्यानचा एक सीन लीक झाला आहे. जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कार्तिक-कियाराच्या लग्नाचा सीन लीक

सोशल मीडियावर लीक झालेल्या व्हिडीओमध्ये कार्तिक-कियाराच्या लग्नाचा सीन सुरु असल्याचं दिसत आहे. यात कार्तिकने शेरवानी परिधान केली असून कियाराने देखील सुंदर लेहंगा परिधान केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

- Advertisement -

चित्रपटाच्या नावावरुन झाला होता वाद

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीच्या ‘सत्यनारायण की कथा’ या चित्रपटाचं मागील काही दिवसांपूर्वी नाव बदण्यात आलं. मागच्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. सोबतच चित्रपचटाच्या नावावरूनही वाद सुरू झाला होता. अनेकांनी या चित्रपटाला हिंदू धर्माविरोधात असल्याचं म्हटलं, त्यानंतर आता निर्मात्यांनी सत्यनारायण की कथा हे नाव बदलून ‘सत्यप्रेम की कथा’ हे नाव ठेवण्याचा निर्णय घेतला.

 

- Advertisement -

हेही वाचा :

‘मैदान’ चित्रपटातून अजय देवगण साकारणार सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -