Video: दीपिका कार्तिककडून शिकली ‘धिमे धिमे’ च्या स्टेप्स!

सोशल मीडियावर सध्या दीपिका पदुकोणचा एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दीपिका कार्तिककडून ‘धिमे धिमे’ च्या स्टेप्स शिकताना दिसत आहे. विमानतळावर दीपिका आणि आर्यन भेटले. यावेळी दीपिकाने विमानतळावरच कार्तिकला ‘धिमे धिमे’ च्या स्टेप्स शिकवण्याची विनंती केली आणि कार्तिकने लगेचच दीपिकाला स्टेप्स शिकवल्या.

सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे चँलेंज सुरु असतात. अलिकडेच ‘बाला चँलेंज’ने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता ‘धिमे धिमे’ हे नवे चँलेंज चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याने हे नवे आव्हान बॉलिवूड कलाकारांना दिले आहे.

कार्तिकने दिलेले हे आव्हान इतर बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच अभिनेत्री दीपिका पदूकोण हिने देखील स्विकारले. परंतु हे आव्हान पूर्ण करण्यासाठी तिने कार्तिकचीच मदत मागितली आहे. दीपिका पदूकोण हिने अभिनेता कार्तिक आर्यनला ‘धिमे धिमे’ या गाण्याच्या डान्स स्टेप्स शिकवण्याची विनंती केली आहे.

“कार्तिक मला धिमे धिमेच्या स्टेप्स शिकव, मला देखील धिमे धिमे चँलेंजमध्ये भाग घ्यायचा आहे.” अशा शब्दात तिने कार्तिकला विनंती केली. यावर कार्तिकने देखील “हो मी शिकवेन, मला खात्री आहे तु लवकर शिकशील” असे म्हणत तिच्या विनंतीचा स्विकार केला.