Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अभिनेता कार्तिक आर्यन घेऊन येतोय मनोरंजनाचा नवा धमाका

अभिनेता कार्तिक आर्यन घेऊन येतोय मनोरंजनाचा नवा धमाका

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमधील ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘सोनू की टीटू की स्वीटी’ चित्रपटांमधील जबरदस्त अभिनयामुळे लोकप्रिय ठरलेला अभिनेता कार्तिक आर्यन गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. कार्तिक आर्यन सोशल मीडियावर बराच अँटिव्ह असून तो चाहत्यांसाठी अनेक फोटो शेअर करत असतो. इंस्टाग्रामवर कार्तिक आर्यनचे तब्बल २१ मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत. यातच कार्तिकने चाहत्यांसाठी एक नवा फोटो शेअर केला आहे. या फोटोसह कार्तिकने लवकरचं नवा मनोरंजनाचा धमाका करण्यास सज्ज असल्याचे म्हटले आहे. कार्तिकच्या नव्या फोटोला चाहत्यांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. brawl Universe मधील हा कार्तिकचा हा नवा अवतार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

- Advertisement -

कार्तिक आर्यनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा नवा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये कार्तिकचा पूर्णपणे एका हटके लुकमध्ये दिसत आहे. या फोटोत त्याने काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले असून एकदम सिरियस लुक केला आहे. हा फोटो शेअर करताना कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “काही तरी वेगळे घेऊन येतोय, काही गेस करु शकता का?. कार्तिकच्या या फोटोवर ६ लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. यावरून चाहत्यांकडून असा अंदाज बांधला जातोय की कार्तिकचा नवा सिनेमा येतोयं. प्रेक्षकांनाही कार्तिकचा अँक्शन अवतार पाहण्यात अधिक उत्सुकता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

- Advertisement -

या फोटोसह कार्तिकने एक टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. हा टीझर व्हिडिओ शेअर करत कार्तिकने लिहिले की, २० जूनला मोठा धमाका करणार आहोत. ज्यामुळे चाहत्यांनाही आनंद होईल. कार्तिकच्या या नव्या धमाकेदार व्हिडिओवर अभिनेत्री भूमी पेंडणेकर, डब्बू रतनानीसह अनेक स्टार्सनी उत्सुकता दर्शवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)


 

- Advertisement -