Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी करण जोहरच्या 'दोस्ताना २'मधून कार्तिकला केलं आऊट, पुढे कधीच काम न करण्याचं...

करण जोहरच्या ‘दोस्ताना २’मधून कार्तिकला केलं आऊट, पुढे कधीच काम न करण्याचं घेतलं वचन

Related Story

- Advertisement -

‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता कार्तिक आर्यनने (kartik aaryan) बऱ्याच संघर्षानंतर फिल्म इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख बनवली. सध्या तो अनेक मोठं मोठ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत काम करत आहे. कार्तिकचं करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शनसोबत (dharma productions) काम करण्याची इच्छा होती आणि त्याला ‘दोस्ताना २’च्या (dostana 2) निमित्ताने ही संधी मिळाली. पण चित्रपट तयार होण्यापूर्वीच कार्तिक आर्यनचे करण जोहर आणि धर्मा प्रोडक्शनसोबतचे नाते तुटल्याचे समोर आले आहे. यामुळे सध्या कार्तिक आर्यन चर्चेत आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

माहितीनुसार, करण जोहरने कार्तिक आर्यनला ‘दोस्ताना २’ चित्रपटातून काढल्याचे समोर आले आहे. तसेच भविष्यात कधीही कार्तिक आर्यनसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दोस्ताना २’ मध्ये प्रमुख भूमिकेत असणारा कार्तिक आर्यनला अचानक चित्रपटातून बाहेर काढण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचे उत्तर सुत्रांनी असे दिले आहे की, कार्तिक आर्यनचा अनप्रोफेशन वागणे आणि चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबतचे मतभेद हे चित्रपटातून त्याला बाहेर काढण्यामागचे प्रमुख कारण आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

- Advertisement -

कार्तिकला दीड वर्षानंतर समजले की, ‘दोस्ताना २’च्या स्क्रिप्टमध्ये काही चुका आहेत आणि तो त्या दुरुस्त करू इच्छित आहे. कार्तिकच्या असे वागणे लक्षात घेता आता धर्मा प्रोडक्शनने त्याच्यासोबत यापुढे कधीही काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिक आर्यन, जान्हवी कपूर आणि लक्ष्य लालवानी स्टारर ‘दोस्ताना २’ची आतापर्यंत २० दिवसांची शूटिंग झाली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे या चित्रपटाचे काहीच शूटिंग झाले नव्हते. लवकरच दुसऱ्या शेड्यूलची शूटिंग सुरू होणार आहे. पण यापूर्वीच कार्तिक आर्यनला करण जोहरने चित्रपटातून काढले आहे. मात्र अजूनही धर्मा प्रोडक्शनने प्रमुख भूमिकेत कार्तिकच्या जागी कोण येणार याबाबत काहीही माहिती दिली नाही आहे. यासर्व प्रकारावर कार्तिक आर्यनची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Viral Video: लॉकडाऊन नाही आहे का? रणबीरचा पापाराझींना सवाल


 

- Advertisement -