घरताज्या घडामोडीDhamaka Trailer: अंगावर शहारे आणणारा कार्तिकच्या 'धमाका'चा ट्रेलर रिलीज

Dhamaka Trailer: अंगावर शहारे आणणारा कार्तिकच्या ‘धमाका’चा ट्रेलर रिलीज

Subscribe

जबरदस्त, मनोवेधक आणि धमाकेदार अभिनेता कार्तिक आर्यन हार्डबॉल पत्रकार अर्जुन पाठकच्या रुपात डिजिटल प्रतालावर ‘धमाका’ करताना दिसून येतो आहे. राम माधवानी दिग्दर्शित ‘धमाका’चे ट्रेलर आज प्रदर्शित झाला असून कार्तिकच्या ट्रांसफॉर्मेशनने चाहत्यांना थक्क केले आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की, रोमांटिक-कॉमेडीचा राजा असलेल्या कार्तिकसाठी चित्रपट ‘धमाका’ करियरचा टर्निंग पॉइंट आहे, ज्याने त्याच्या करियर ग्राफला नवी डायमेंशन दिली आहे.

यापूर्वी कार्तिकमधल्या कधीच न पाहिलेल्या कलाकाराला समोर आणत, ट्रेलरने दर्शकांना त्या प्रत्येक गोष्टीची झलक दिली आहे, जी त्यांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अभिनेत्यातील एका नव्या पैलूची देखील ओळख या निमित्ताने करून दिली आहे. ‘धमाका’चा हा ट्रेलर कार्तिक आर्यनच्या परफॉर्मेंसच्या कंटेंटचा आकर्षक पीस आहे.

- Advertisement -

कार्तिकने आपल्या व्यक्तीरेखेसाठी कसून तयारी केली होती. ‘धमाका’मध्ये कार्तिक एका सनकी न्यूज अँकरची भूमिका साकारत आहे, ज्याला एका रेडियो शोदरम्यान एक अलार्मिंग कॉल येतो आणि त्यानंतर घडणाऱ्या घटनाक्रमांमध्ये त्याला आपल्या विवेकाची देखील किंमत मोजावी लागू शकते.

एक जबरदस्त प्रभाव निर्माण करत, ट्रेलरने सोशल मीडियावर हलवून टाकले असून चाहते कार्तिकची प्रशंसा करण्यापासून स्वतःला अडवू शकत नाहीयेत. ट्रेलरमधल्या अभिनेत्याच्या अभिनयातील वेगळेपण देखील अधोरेखित होत असून त्याच्या लुकचे देखील खूप कौतुक होत आहे.

- Advertisement -

राम माधवानी यांना आपल्या अभिनेत्यांमधील सर्वश्रेष्ठ गुण बाहेर आणण्यासाठी ओळखले जाते आणि ‘धमाका’चा ट्रेलर पाहताना हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही कि हा कार्तिक आर्यनचा आता पर्यंतचे सर्वोत्तम चित्रपट असेल.


हेही वाचा – sunny deol birthday: यामुळे १६ वर्ष शाहरुख खानसोबत बोलला नाही सनी देओल


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -