घरमनोरंजनहिना खानचा 'कसौटी जिंदगी की २' मालिकेला रामराम!

हिना खानचा ‘कसौटी जिंदगी की २’ मालिकेला रामराम!

Subscribe

हिना खानने तीन हिंदी चित्रपट साईन केले असून, लवकरच ती 'कसौटी जिंदगी की २' या मालिकेचा निरोप घेणार आहे.

हिना खान ही टेलिव्हीजनची लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ या मालिकेमधून २००९ मध्ये हिनाने टेलिव्हीजनमध्ये पदार्पण केलं. याशिवाय ‘फिअर फॅक्टर: खतरो के खिलाडी ८’ आणि ‘बिग बॉस ११’ या रिअॅलिटी शो मधूनही ती झळकली आहे. दरम्यान, हिना खान आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हिना तिच्या चाहत्यांना एक आनंदाची तर एक दु:खाची अशा दोन बातम्या देणार आहे. हिनाने एकापाठोपाठ एक तीन हिंदी चित्रपट साईन केले आहेत. ही बातमी तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची ठरली आहे. मात्र, दुसरीकडे एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की २’ या मालिकेतून हिना एक्झिट घेणार असल्यामुळे चाहते नाराजही झाले आहे.  या मालिकेमध्ये हिना साकारत असलेली ‘कमोलिका’ प्रेक्षकांना अलविदा करणार आहे. येत्या मार्चपासून हिना ‘कसौटी जिंदगी की २’ या मालिकेला रामराम करणार आहे. मालिकेसाठी हिनाजवळ वेळ नसल्यामुळे ती मालिका सोडत असल्याचं समजत आहे.

मात्र, दुसरीकडे एक वेगळीच चर्चा रंगत आहे. ‘कसौटी जिंदगी की २’ या मालिकेतील कमोलिकाच्या रोलमध्ये हिना समाधानी नसल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. उपलब्ध माहितीनुसार, हिना तिच्या डेब्यु चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे आता नेमक्या कोणत्या कारणामुळे हिना ‘कसौटी जिंदगी की २’मधून बाहेर पडणार? याविषयी चर्चा रंगते आहे. एका खासगी वेबसाईटच्या माहितीनुसार, हिनाने तिच्या डेब्यू फिल्ममध्ये एका स्वतंत्र मुलीची भूमिका साकारली असून, हा एक स्त्रीप्रधान चित्रपट आहे. चित्रपटाची कथा ही ९० च्या दशकातील काश्मीर परिस्थितीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक हुसैन खान असून, कथा राहत काजमी आणि शक्ती सिंह यांची आहे. आता हिनाच्या आगामी चित्रपाटला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात? हे पाहावं लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -