कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी व प्रसिद्ध अभिनेत्री कश्मीरा शाह हिच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. कश्मीराचा अपघात झाला आहे. तिने इन्स्टाग्रामवर अपघाताची माहिती दिली आहे. अपघातातून थोडक्यात बचावली आहे. काहीतरी मोठं होणार होतं पण वाचले, असं कश्मीराने म्हटलं आहे.
कश्मीरा सध्या लॉस एंजेलिस शहरामध्ये होती. तिचा पती आणि अभिनेता कृष्णा अभिषेक मुलांसह 7 नोव्हेंबरला भारतात परतला. पण काही कारणास्तव कश्मीरा LA ला थांबली होती. अशातच प्रवास करताना कश्मीराचा अपघात झाला. तिने फोटो शेअर करत लिहिले की, “मला वाचवण्यासाठी देवाचे खूप आभार. खूप भयानक घटना घडली. काही मोठं होणारच होतं. पण मी वाचले. जखमांचे डाग राहणार नाहीत अशी आशा. प्रत्येक दिवस आनंदाने जगा”.पुढे तिने लिहिले की, “पुन्हा भारतात परत येण्याची वाट बघत होतो. मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे.”. यावेळी तिने नवऱ्याचं आणि तिच्या मुलांचीदेखील नावं लिहिली आहेत.
View this post on Instagram
कश्मीराने ‘लालबाग परळ’, ‘शिकारी’ अशा मराठी सिनेमांमध्ये अभिनय केला असून ती हिंदी सिनेसृष्टीतही सक्रीय आहे. . नुकतीच ती नवरा कृष्णा अभिषेकबरोबर कलर्स वाहिनीवरील ‘लाफ्टर शेफ्स’ या कार्यक्रमामध्ये दिसून आली होती.