Katrina -Vicky Kaushal Anniversary: विक्की कॅटच्या लग्नाला एक महिना पूर्ण, शेअर केला रोमँटिक फोटो

दोघांनी लग्नाच्या पहिल्या महिन्याचा वाढदिवस सेलिब्रेट केला. दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत एकमेकांना लग्नाच्या पहिल्या महिन्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

Katrina kaif and Vicky Kaushal share romantic phhotos on her one month wedding Anniversary
Katrina -Vicky Kaushal Anniversary: विक्की कॅटच्या लग्नाला एक महिना पूर्ण, शेअर केला रोमँटिक फोटो

बॉलिवूडचे चर्चीत कपल असलेल्या विक्की कौशल आणि कतरिना यांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली. आता दोघांचे लग्न होऊन एक महिना झाला आहे. (Katrina kaif and Vicky Kaushal one month wedding anniversary)  दोघांनी लग्नाच्या पहिल्या महिन्याचा वाढदिवस सेलिब्रेट केला. दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत एकमेकांना लग्नाच्या पहिल्या महिन्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. दोघेही लग्नाचा वाढदिवस साजरा करताना रोमँटिक अंदाजात दिसले.

विक्कीने कतरिनासोबत काढलेला सेल्फी काही वेळातच तूफान व्हायरल झाला. १३ मिनिटात जवळपास ५ लाखांहून अधिक लाईक्स फोटोला होते. ‘हॅपी वन मन्थ माय लव्ह’ म्हणत ‘हार्ट इमोजी’ पोस्ट करत दोघांनी रोमँटिक फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रा दिया मिर्झा, नेहा धूपिया,रणवीर सिंह,वाणी कपूर, जोया अख्तर यासारख्या अनेक सेलिब्रेटींनी विक्की कॅटला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विक्की कॅटने शेअर केलेल्या रोमँटिक फोटोमध्ये दोघेही अगदी खूश दिसत होते. दोघांच्या चेहऱ्यावर सुंदर स्माइल पाहून त्यांचे चाहते देखील त्यांच्यावर फिदा झाल्याचे पहायला मिळाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

विक्की कतरिनान ९ डिसेंबरला राजस्थानच्या आलिशाल किल्ल्यावर थाटात लग्न केले. विरुष्का आणि दीपवीरनंतर शाही थाटात आणि गुप्त पद्धतीने झालेले हे लग्न होते. ७०० वर्ष जुन्या सिक्स सेंस फोर्ट मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. दोघांनी लग्नाबाबत फार गुप्तता बाळगली होती. काही जवळचे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांनी साता जन्माची गाठी बांधल्या. दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर तूफान चर्चा झाली आणि आजही होत आहे.

Vicky-Katrina लग्नानंतर पहिल्यांदाच करणार एकत्र काम

कतरिनाच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचे झाले तर कतरिना आगामी काळात टायगर३, जी ले जरा, मेरी क्रिसमस आणि फोन बूध या सिनेमात दिसणार आहे. तर विक्की कौशलचे या वर्षात तीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ज्यात गोविंदा नाम मेरा. द ग्रेड इंडियन फॅमिली आणि मिमी या सिनेमात विक्की दिसणार आहे. त्याचप्रमाणे विक्की आणि कतरिना एकत्र एका जाहिरातीतही काम करणार आहे. पहिल्यांदा दोघांना एकत्र काम करताना पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतूर आहे.


हेही वाचा – Katrina लग्नानंतर हॉट अवतारात, ओव्हर साइज स्वेटर अन् मंगळसूत्राने वेधले लक्ष