Katrina लग्नानंतर हॉट अवतारात, ओव्हर साइज स्वेटर अन् मंगळसूत्राने वेधले लक्ष

कतरीनाला बॉलिवूडची 'बार्बी गर्ल' म्हणून ओळखले जाते. ही बार्बी गर्ल लग्नाआधी सुंदर दिसत होती मात्र लग्नानंतर ती आणखी सुंदर दिसायला लागली आहे.

Katrina kaif in hot Look after marriage share photo with oversized sweater and Mangalsutra
Katrina लग्नानंतर हॉट अवतारात, ओव्हर साइज स्वेटर अन् मंगळसूत्राने वेधले लक्ष

बॉलिवूडची नवी नवरी कतरीना कैफ (Katrina Kaif)   तिचे नवे वैवाहिक आयुष्य एजॉय करत आहे. कतरिना सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. लग्न झाल्यापासून कतरिना तिच्या नव्या घरातील अनेक फोटो सतत शेअर करत असते. कतरीनाला बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’ म्हणून ओळखले जाते. ही बार्बी गर्ल लग्नाआधी सुंदर दिसत होती मात्र लग्नानंतर ती आणखी सुंदर दिसायला लागली आहे. कतरिनाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. कतरिनाचा हॉट अवतार पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना पहायला मिळालाय.

कतरिनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने डायमंडचे मंगळसूत्र घातले आहे. या मंगळसूत्राने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्यातच कतरिनाने घातलेल्या ओव्हर साईज स्वेटर देखील सर्वांच्या पसंतीस उतरले आहे. ‘होम स्वीट होम’ असे म्हणत कतरिनाने फोटो शेअर केले आहेत. विक्की कतरिनाच्या नव्या घरातील हा कतरिनाचा पहिलाच फोटो आहे. विक्कीच्या घराची छोटीशी झलक फोटोमधून दिसली आहे. कतरिना घराच्या एका कोपऱ्यात सोफ्यावर बसली आहे. ओव्हर साइज स्वेटर आणि आणि डायमंड मंगळसूत्राने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

विक्की कतरिनाच्या घराविषयी बोलायचे झाले तर विक्की कतरिना हे विराट अनुष्काचे आता शेजारी झाले आहेत. विक्की कतरिना लग्नाच्या शुभेच्छा देताना अनुष्काने या गोष्टीचा खुलासा केला होता. कतरिनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांच्या घरातील डेकोरेशन , फर्नीचर आणि सिलींग डिझाइन कॅप्चर करण्यात आले आहे. कतरिनाने घरात फ्लॉवर प्लांट देखील लावले आहेत. कतरिनाने लग्नानंतर पहिल्यांच दिवशी शिरा बनवला होता त्यावेळी कतरिनाने बालकनीतील फोटो शेअर केला होता.

विक्की आणि कतरिना लग्नानंतर कामाला लागले आहेत. दोघेही लवकरच एका जाहिरातीत एकत्र काम करताना दिसणार आहे. यानिमित्ताने विक्की कॅट पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसणार आहे.त्यामुळे त्यांचे फॅन्स त्यांना एकत्र पाहण्यासाठी प्रचंड आतूर झाले आहेत.


हेही वाचा – Katrina Kaif vicky Kaushal: मिस्टर अँड मिसेस Kaushal होणार विरुष्काचे शेजारी, अनुष्काने केला खुलासा