Katrina Kaif Look alike : कतरिना कैफची डुप्लिकेट अलीना रॉयची सोशल मीडियावर धूम

Katrina Kaif Look alike alina rai storms the internet
Katrina Kaif Look alike : कतरिना कैफची डुप्लिकेट अलीना रॉयची सोशल मीडियावर धूम

Katrina Kaif duplicate Alina Rai: आपल्या सारखीच हुबेहुब दिसणारी व्यक्ती असणे म्हणजे एका प्रकारचं आश्चर्य म्हणावं लागेल, मात्र बॉलिवूड कलाकारांसारखे हुबेहुब दिसणाऱ्या व्यक्ती अनेकदा समोर आल्या आहेत. यामध्ये एश्वर्या रॉय, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अनुष्का शर्मा, जॅकलीन यांच्यासारख्या दिसणारे डुप्लिकेट आहेत. याआधी कतरिनासारखी दिसणारी झरीन खान हिची देखील जोरदार चर्चा झाली. मात्र गेल्या काही दिवसांपासून कतरिनासारखीच हुबेहुब दिसणाऱ्या अलीना रॉयची विशेष चर्चा सुरु आहे. सध्या कतरिना माध्यमांपासून दूर असली तरी ती डुप्लिकेट अलीना तिची कमी भरून काढतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alina Rai (@alinarai07)

अलीनाने इस्टाग्रामवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसह तिने ‘फेमस हूं’ असं कॅप्शन लिहिले आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला २७८५ लाईक्स मिळाले आहे. ज्यात तिने काळ्या रंगाची स्ट्रीप्स ड्रेस परिधान केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alina Rai (@alinarai07)

अलीनाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात देवाला असं सांगताना दिसतेय की, हे देवा माझं तु ऐकत का नाही?. यानंतर देवाचा आवाज येतो की, तुझी वागणूक पाहून मी तुला ब्लॉक केलेय. अलीनाच्या या मजेशीर व्हिडिओवर भन्नाट भन्नाट कमेंट्स येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alina Rai (@alinarai07)

याशिवाय अलीनाने एका चित्रपटाच्या शूटिंगच्या बॅक-द-सीन क्लिप शेअर केली आहे. या चित्रपटाचे नाव ‘लखनऊ जंक्शन’ असे आहे. हा चित्रपट गेल्यावर्षी रिलीज होणार होता. मात्र कोरोना महामारीमुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. ज्यात ती पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय २०१९ मध्ये तिने लोकप्रिय रॅपर बादशाहच्या ‘कमाल’ या म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले होते. कतरिनाच्या लुक अ लाईक अलीनाला आत्ता बॉलिवूडमधूनही अनेक ऑफर येत आहेत.

अलीनाने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धूम मचवली आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेली अलीना राय ही टिक टॉक सेंसेशन आणि फॅशन ब्लॉगर आहे. या टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तर ही कतरिना आहे की अलीना हे ओळखणे देखील अवघड व्हायचे. सोशल मीडियावर तिचे फोटो पाहिल्यावरही लक्षात येते की, ती हुबेहुब कतरिनासारखीच दिसते. ती सध्या मुंबईत राहते. अलीना कतरिनासारखी दिसत असल्याने तिच्या फोटोंना भरपूर लाईक आणि कमेंट पाहायला मिळतात. फॅशन ब्लॉगर असलेल्या अलीनाचे इन्स्टाग्राम अकाउंटवर २ लाख ९ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत.

भारतात सध्या टिकटॉकवर बंदी असली तरी अलीना नेटकऱ्यांमध्ये खास पॉप्युलॅरिटी मिळत आहे. टिकटॉकनंतर आता अलीनाने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो, व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. सध्या अलीना इंटरनेटवर चर्चेत असल्याने नेटकऱ्यांनी तिचे आणि कतरिनाचे फोटो कोलाज करुन अपलोड केले आहेत.