रणबीरशी ब्रेकअप केल्यानंतर ३ वर्षांनी कतरिनाने केला मोठा खुलासा

ब्रेकअपनंतर रणबीर काहीच बोलला नाही, यासोबत कतरिनाने ही उघडपणे कोणतीच चर्चा केली नाही. परंतु आता कतरिनाने दोघांच्य़ा ब्रेकअपनंतर मोकळेपणाने चर्चा केली आहे.

एकवेळ अशी होती की, बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता रणबीर कपूर या दोघांच्या भेटीगाठी सुरू होत्या. दोघे विवाह बंधनात अडकणार होते. परंतु, जास्त काळ त्यांचे नाते टिकले नाही. दोघेही वेगळे झाले. या ब्रेकअपनंतर रणबीर काहीच बोलला नाही, यासोबत कतरिनाने ही उघडपणे कोणतीच चर्चा केली नाही. परंतु आता कतरिनाने दोघांच्य़ा ब्रेकअपनंतर मोकळेपणाने चर्चा केली आहे.

 

View this post on Instagram

 

भारत

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

अशी म्हणाली कतरिना!

यावेळी कतरिनाने सांगितले की, मला ब्रेक घेणं जरूरी होते. कारण मला आयुष्यात पुढे जायचे होते. माझ्यासोबत घडणारी प्रत्येक गोष्ट मला अनुभवायची होती. या नात्यात मला माझी जबाबदारी घ्यायची होती. परंतु जीवनाच्या या टप्प्यावर माझ्या आईने मला खूप पाठिंबा दिला. यामुळे मला दुखातून सावरणे सोपे झाले. सगळ्याच मुलींच्या आयुष्यातील असा प्रसंग येत असतो. तुला असे वाटत असेल तू एकटी आहे, तर असे समजू नको तुझ्यासोबत मी आहे, असे कतरिनाच्या आईने सांगितले.

 

कतरिना लवकरच सलमान खान सोबत भारत या चित्रपटात सोबत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी ५ जूनला प्रदर्शित होणार आहे. तसेच रणबीर कपूर ब्रम्हास्त्र या चित्रपटात दिसणार आहे. सध्या रणबीर कपूर आणि आलीया भट्ट यांच्यात डेटिंग सुरू असून कतरिना कैफ सिंगलच आहे.