Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन इसाबेल कैफचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

इसाबेल कैफचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

इसाबेल कैफ 'टाईम टू डान्स ' या चित्रपटातून झळकणार आहे.

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री कतरिना कैफची बहिण इसाबेल कैफचे बॉलिवूडमध्ये पदार्पण होणार आहे. इसाबेल ‘टाईम टू डान्स ‘ या चित्रपटातून झळकणार आहे. इसाबेल कैफच्या या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली असून, हा चित्रपट 12 मार्चला प्रदर्शित होणार आहे. इसाबेलसोबत अभिनेता सूरज पांचोली दिसणार आहे. हा चित्रपट डान्सशी संबंधित आहे. या चित्रपटाची निर्मिती कोरिओग्राफर रेमो डिसूझाची पत्नी लिझेलने केली आहे. तर कोरिओग्राफर स्टॅनली डिकोस्टा हा या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करतो आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Isabelle Kaif (@isakaif)


यापूर्वी कॅटरिना कैफची बहीण इसाबेलने २०१४ मध्ये ‘डॉ. कैबी’ नावाच्या एका क्रॉसओवर चित्रपटात छोटी भूमिका साकारली होती. हा चित्रपट कन्नड असून, सलमान खानने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट एका बेरोजगार डॉक्टरच्या कहानीवर आधारित आहे. यासोबतच इसाबेलने कॉस्मेटिक्स ब्रँडच्या एका जाहिरातीमध्येही काम केले होते.

- Advertisement -

चार वर्षांपूर्वीही इसाबेल कैफने बॉलिवूडमध्ये येण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिच्या वाट्याला अपयश आले होते, मात्र सलमान खानच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे. यापूर्वीही कतरिना कैफचे करिअर घडवून आणण्यात बॉलिवूडचा दबंग सलमान खानचे मोठे योगदान आहे. कतरिनाची बहीण इसाबेल कैफ बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार असल्याची घोषणा स्वतः सलमान खानने सोशल मीडियावर केली आहे.


हेहि वाचा – ‘वर्षातील माझा सर्वात आवडता दिवस’ बिपाशाने केला करणचा बर्थडे सेलिब्रेट

- Advertisement -