घरताज्या घडामोडीविक्की-कतरिनाने ८० कोटींमध्ये Amazon Prime Videoला विकले लग्नाचे फुटेज

विक्की-कतरिनाने ८० कोटींमध्ये Amazon Prime Videoला विकले लग्नाचे फुटेज

Subscribe

सध्याच्या ट्रेंडिंग टॉपिकमध्ये विक्की कौशल आणि कतरिना कॅफच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. विक्की आणि कतरिनाच्या लग्नाबाबतच्या प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक असतात. माहितीनुसार विक्की आणि कतरिना उद्या ९ डिसेंबरला राजस्थानच्या सवाई माधोपूरमधील सिक्स सेंस फोर्टच्या बडवारामध्ये सात फेरे घेणार आहेत. या लग्नात प्रायव्हसीची अधिक काळजी घेतली जाणार आहे. माहितीनुसार विक्की आणि कतरिनाने एका ओटीटी प्लेटफॉर्मला आपल्या लग्नाचे राइट्स विकले आहेत. त्यामुळे लग्नात कोणतेही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होणार नाहीत, याची अधिक काळजी घेतली जाणार आहे.

माध्यमाच्या वृत्तानुसार ओटीटीवरील लोकप्रिय प्लॅटफॉर्म अॅमेझोन प्राईम व्हिडिओला विक्की-कतरिनाच्या लग्नाचे व्हिडिओ दाखवण्याचे राइट्स मिळाले आहेत. एका इंग्लिश वेबसाईटच्या माहितीनुसार, विक्की आणि कतरिनाने आपल्या लग्नाचे टेलिकास्ट राइट्स अॅमेझोन प्राईमला विकले आहेत. हे डील ८० कोटींमध्ये फायनल झाले आहे. यासाठी विक्की आणि कतरिनाने आपल्या पाहुण्याकडून एनडीए साईन केले आहे. जेणेकरून ओटीटी प्लॅटफॉर्मच्या अगोदर लग्नाचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ नयेत.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी विक्की आणि कतरिनाच्या लग्नाचे एक्सक्लूसिव्ह व्हिडिओसाठी एक ओटीटी प्लॅटफॉर्मने त्यांना १०० कोटीची ऑफर केली होती. दरम्यान विक्की आणि कतरिनाच्या लग्नाच्या सीरिजमध्ये त्यांच्या रोमांसपासून रोका सेरेमनी आणि चार दिवसांमधील राजस्थानमधील झालेला सोहळातील सर्व काही दाखवले जाणार आहे. विक्की आणि कतरिनाच्या लग्नाचा व्हिडिओ २०२२मध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाईल. यापूर्वी २०१९मध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनसने आपल्या लग्नाची सीरिजची डील ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत केली होती.


हेही वाचा – माहितीय का? ज्योतिष आणि अंक गणितानुसार कसं असेल vicky आणि Katrinaचं नव आयुष्य

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -