Katrina Kaif vicky Kaushal: मिस्टर अँड मिसेस Kaushal होणार विरुष्काचे शेजारी, अनुष्काने केला खुलासा

र बॉलिवूडचं आणखी एक कपल एकमेकांचे शेजारी होणार

Katrina Kaif vicky Kaushal will be neighbours of virat kohli and anushka sharma
Katrina Kaif vicky Kaushal will be neighbours of virat kohli and anushka sharma

बॉलिवूडचं आताच लग्न झालेलं कपल म्हणजे अभिनेत्री विक्की कौशल आणि कतरिना कैफ. ९ डिसेंबरला राजस्थानमध्ये दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. दोघांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर चाहत्यांना सप्राइज देखील दिले. दोघे लग्नानंतर मुंबईला परतले आहेत. मुंबई दोघे कुठे राहणार असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल तर याचं उत्तर अभिनेत्री अनुष्का शर्माने दिलं आहे. अनुष्काने विक्की कतरिनाला लग्नाच्या शुभेच्छा देत तुमच्या येण्याने आम्हाला कन्सट्रक्शनच्या कामापासून सुट्टी मिळणार असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच आता विक्की कतरिना अनुष्का विराटचे शेजारी होणार हे यातून स्पष्ट झाले आहे.

अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम एक पोस्ट शेअर करत विक्की कतरिनाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. दोघांच्या लग्नाचा सुंदर फोटो पोस्ट करत, ‘दोन सुंदर माणसांना त्यांच्या लग्नाच्या खुप साऱ्या शुभेच्छा. तुमच्यातील प्रेम आणि समूजतदारपणा आयुष्यभर असाच राहू देत. तुमच्या लग्नासाठी मी खुश आहे कारण लवकरच तुम्ही तुमच्या घरी शिफ्ट होणार आहात आणि आम्हाला कन्सट्रक्शन कामाच्या आवाजापासून सुट्टी मिळणार आहे’, असे कॅप्शन दिले आहे. अनुष्काच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे आणि विक्की कतरिना विरुष्काचे शेजारी होणार हे यातून स्पष्ट झालं आहे.

अनुष्काच्या या पोस्टनंतर बॉलिवूडचं आणखी एक कपल एकमेकांचे शेजारी होणार आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी हे एकमेकांचे शेजारी आहेत आणि त्यांच्यात फार चांगले बॉडिंग तयार झाले आहे. आता विक्की कतरिना आणि अनुष्का विराट एकमेकांचे शेजारी होणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, विक्की कतरिनाने जुहू येथील राज महल येथील एक अपार्टमेंट भाड्याने घेतली आहे. याच अपार्टमेंट विरुष्का देखील राहतात. ही इमारत अल्ट्रा लक्झरी आहे. विक्की कतरिना ६० महिने म्हणजेच ५ वर्षांसाठी ही अपार्टमेंट भाड्याने घेतली आहे. विक्की कतरिनाने जुलै २०२१मध्ये या अपार्टमेंटमधील ८वा माळा भाड्याने घेतला आहे. या अपार्टमेंटसाठी १.७५ करोड डिपॉझिट देण्यात आले आहे. ३६ महिन्यांसाठी अपार्टमेंटचं एका महिन्याचे भाडे ७ ८ लाख रुपये इतकं आहे. पुढील वर्षात या अपार्टमेंटचं भाडं वाढून ८.८२ लाख महिना इतके होणार आहे.


हेही वाचा – Vicky Katrinaच्या लग्नाचे फोटो आले समोर, पहा मिस्टर अँड मिसेस Kaushalची पहिली झलक