कतरिना कैफचा ‘फोन भूत’ चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित

कतरिना कैफचा 'फोम भूत' चित्रपटाबाबत निर्मात्यांना अनेक अपेक्षा आहेत. दरम्यान या चित्रपटाबाबत एक नवीन बातमी समोर आली आहे. तसेच आता प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘फोन भूत’मुळे चर्चेत आहे. ‘फोन भूत’ चित्रपटाआधी कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीच्या ‘भूल भुलैया 2’ चित्रपट सुद्धा याचं पद्धतीचा हॉरर-कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई केली होती. आता कतरिना कैफचा ‘फोम भूत’ चित्रपटाबाबत निर्मात्यांना अनेक अपेक्षा आहेत. दरम्यान या चित्रपटाबाबत एक नवीन बातमी समोर आली आहे. तसेच आता प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

या दिवशी रिलीज होणार

 कतरिना कैफ , सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांचा ‘फोन भूत’ हा हॉरर-कॉमेडी चित्रपट सध्या सोशल मीडियावरही खूप चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतीच या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भात चित्रपटाचे पोस्टर शेअर करत या चित्रपटाचे निर्माते फरहान अख्तर यांनी माहिती दिली आहे. ही पोस्ट शेअर करत फरहान अख्तरने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘फोन भूतच्या जगामध्ये तुमचे स्वागत आहे, चित्रपट ७ ओक्टोंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट समोर येताच चाहते खूप खूश झालेले आहेत. निर्मात्यांचा अंदाज आहे की कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’ प्रमाणेच हा चित्रपट सुद्धा सुपरहिट होईल.

कोण-कोण असणार या चित्रपटात
‘फोन भूत’ चित्रपटामध्ये कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्यासोबत जॅकी श्रॉफ सुद्धा दिसून येणार आहे. हा चित्रपट ७ ओक्टोंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :हृता दुर्गुळेचा ‘अनन्या’ चित्रपट २२ जुलै रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला