ब्रेकअपनंतर तीन वर्षांनी कतरिना-रणबीर एकत्र दिसणार

आता त्यांनी त्यांचा निर्णय बदलला आहे. पण ही जोडी चित्रपटात नव्हे तर मोबाईल फोनच्या जाहिरातीत एकत्र दिसणार आहे. 

ranbir-kapoor-katrina-kaif-

बॉलीवूडची एकेकाळची सर्वात लोकप्रिय जोडी कतरिना-रणबीर यांच्या ब्रेकला तीन वर्षं झाली. त्यानंतर आता पुन्हा ही जोडी त्यांच्या चाहत्यांना एकत्र काम करताना पाहता येणार आहे. विशेष म्हणजे ब्रेकअप नंतर रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांना एकमेकांबरोबर काम करायचे नव्हते. पण आता त्यांनी त्यांचा निर्णय बदलला आहे. पण ही जोडी चित्रपटात नव्हे तर मोबाईल फोनच्या जाहिरातीत एकत्र दिसणार आहे.

रणबीर कपूर हे चित्रपटातून एकत्र काम करणार नाहीत. तर एका मोबाईल फोनच्या जाहिरातीत ते दोघे झळकणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान जग्गा जासूस या चित्रपटानंतर त्या दोघांनी एकत्रित काम केले नाही. यापूर्वी अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटातसुद्धा ही जोडी पाहता आली.

View this post on Instagram

Happy birthday @aliaabhatt ?? #AliaBhatt #KatrinaKaif

A post shared by RK & KK – My Idols! (@ranbirkatrinaforever) on

ब्रह्मास्त्र या चित्रपटात रणबीर कपूर आलिया भट, अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, नागार्जुन व मौनी रॉय यांसह दिसेल. तर रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी या चित्रपटात अक्षय कुमार, कतरिना कैफची जोडी झळकणार आहे.