सासू आणि पतीसोबत कतरिनाने घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. 9 डिसेंबर 2021 रोजी दोघांचं लग्न झालं होतं. तेव्हापासून दोघंही अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच कतरिना आण विक्की जोधपूरमध्ये फिरायला गेले होते. त्यावेळीचे काही फोटो त्यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर देखील केले होते. दरम्यान, नुकतेच कतरिना आणि विक्की मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात गेल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

सासू आणि पतीसोबत कतरिनाने घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन

jagranशुक्रवारी सकाळी कतरिना आपल्या सासू आणि पतीसोबत मुंबईतील सिद्धीविनायकाच्या मंदिरात पोहोचली. यावेळचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. या फोटोंमध्ये कतरिना पारंपारिक वेशात दिसत आहे. तिने हिरव्या रंगाचा प्रिटेंड कुर्ता परिधान केला होता आणि डोक्यावर ओढणी देखील घेतली होती.

कतरिनाचे फोटो पाहून चाहते आनंदी
कतरिना मूळची भारतीय नसूनही ती इथल्या परंपरांचे आवडीने पालन करते. कतरिनाचे हे फोटो पाहून चाहते खूप आनंदी झाले आहेत. अनेकजण तिचं कौतुक देखील करु लागले आहेत. एका युजरने लिहिलंय की, “कतरिना खूप आदरणीय स्त्री आहे. परदेशात लहानाची मोठी झाली असून देखील एवढे संस्कार आहेत.” दुसऱ्या एकाने लिहिलंय की, “हे खूप छान कुटुंब आहे, देव तुमच्यावर असाच आशिर्वाद ठेवो.”

 


हेही वाचा :

बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंड बंद व्हायला हवा – सुनील शेट्टी