Katrina Kaif Vicky Kaushal Wedding : विक्की – कतरिना लग्नाचे फोटो मॅग्जीनला विकणार?

फोटो मॅग्जीनला देण्यासाठी कतरिना आणि विक्की कौशल मोठी रक्कम मोजणार

Katrina-Vicky Kaushal to sell wedding photo to magazine

बॉलिवूडचं सध्याच सर्वात ट्रेडिंग कपल म्हणजे विक्की कौशल आणि कतरिना कैफ (Katrina Kaif Vicky Kaushal Wedding)  दोघांच्या लग्नाची तारिख जवळ येऊ लागली आहे. मात्र तरीही देखील दोघांनी लग्नाची कोणताही बातमी स्वत:हून चाहत्यांना दिलेली नाही. आता तुम्हाला वाटेल की विक्की आणि कतरिना त्यांच्या लग्नाचे शानदार फोटो सोशल मीडियावर शेअर करतील. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना आणि विक्की कौशल त्यांच्या शाही लग्नाच्या फोटोंचे राइट्स एका इंटरनॅशनल मॅग्जीनला विकणार आहेत. कतरिना आणि तिची टीम या मॅग्जीनची इंडियन आवृत्ती आणण्यासाठी डिल करत असल्याचे सांगितलं जात आहे. फोटो मॅग्जीनला देण्यासाठी कतरिना आणि विक्की कौशल मोठी रक्कम मोजणार आहेत. करोडो रुपयांना त्यांच्या लग्नाचे फोटो विकले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे विक्की आणि कतरिनाच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांसाठी नो फोन पॉलिसी दिल्याचे देखील म्हटलं जात आहे. लग्नाला येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांकडून दोघेही NDA म्हणजेच नॉन डिस्क्लोजर एग्रीमेंट साइन करुन घेणार आहे. ज्यात दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणार नाही असे लिहून घेतलं जाणार आहे. या आधी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांनी देखील त्यांच्या लग्नाचे फोटो पीपल मॅग्जीनला २.५ मिलियन यूएस डॉलरला विकल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अभिनेत्री सोनम कपूर आणि प्रिती झिंटा यांनी देखील आपल्या लग्नाचे फोटो अशाच काही मॅग्जीनला विकले होते.

विक्की कतरिना ९ डिसेंबरला राजस्थानच्या सिक्स सेंस हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत. हे हॉटेल म्हणजे ८०० वर्ष जुना किल्ला आहे. या किल्ल्याचे रुपांतर आलिशान हॉटेलमध्ये करण्यात आलं आहे. किल्ल्यातील राणी पद्मावतीची खोली कतरिनासाठी बुक करण्यात आली आहे. ७ डिसेंबरला कतरिनाचा मेहंदी कार्यक्रम ८ डिसेंबरल संगीत आणि ९ डिसेंबर विक्की कतरिनाचं लग्न होणार आहे.

 


हेही वाचा – Vicky Kaushal Katrina Kaif Wedding: काय सांगता! कतरिनाने लग्नासाठी बुक केलीय १४ लाखांची खोली