अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरीना कैफ यांच्या विवाहाची चर्चा गेले अनेक दिवसापासून सोशल मिडियावर रंगली आहे. दिवाळीमध्ये विक्की आणि कॅटरीनाची रोका सेरेमनी पार पडली. विक्की आणि कतरिनाचे लग्न बॉलिवूडमधील हेवी बजेटवाले असणार आहे. ज्यामध्ये राजस्थानची रॉयल्टी पाहायला मिळेल. मात्र हे दोघेही लग्नबंधनात अडकणार याची माहिती मिळताच चाहत्यांच्या प्रश्नांना उधाण आले आहे.बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल हे दोघे येत्या ७ डिसेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान राजस्थानमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत.राजस्थानमधील सवाई माधोपुरच्या सिक्स सेंसेस फोर्ट बारवरामध्ये या लग्नाची बुकिंग झाली आहे. कॅबचेही बुकिंग मोठ्या प्रमाणात झाली आहे. दोघांच्याही टीम जयपूरला तयारीसाठी पोहोचल्या असून या लग्नाला दोघांचेही कुटुंबीय आणि मित्र परिवार उपस्थित असतील असे सांगितले जात आहे.सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्यातील संबंध सर्वांनाच माहित असून, कॅटरीना कॅफला बॉलीवूड क्षेत्रात भरारी घेण्याकरिता सलमान खानने मदत केली आहे.अशावेळी कॅटरीनाचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खान कॅटरिनाच्या लग्नाला हजेरी लावणार की नाही, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित राहत आहे.
लग्नाची पहिली निमंत्रण पत्रिका सलमान खानला दिली,पण…
या लग्नाला उपस्थित राहणाऱ्यांच्या यादीत सिद्धार्थ मल्होत्रा, मिनी माथुर, करण जौहर, कियारा आडवाणी, रोहित शेट्टी वरुण धवन आणि नताशा दलाल उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार सलमान खान कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याचे कळते आहे. या लग्नाची पहिली निमंत्रण पत्रिका सलमान खानला दिली होती, असे सांगितले जात आहे
विक्का आणि कतरिनाचा हनिमून प्लॅन?
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, लवकरच विक्की आणि कतरिना आपल्या लग्नाबाबत घोषणा करणार आहेत. त्या दोघांची गुपचूप पद्धतीने काहीसुद्धा करण्याची इच्छा नाही. तसेच विक्की आणि कतरिना आपल्या कामातून कोणताही मोठा ब्रेक घेऊ इच्छित नाहीत. लग्नानंतर दोघेही कामासंदर्भात केलेल्या कमिटमेंट पूर्ण करतील. यामुळे दोघेसुद्धा हनीमून करणार नाहीत. लग्नानंतर कतरिना लगेचच कामावर परतणार आहे. तिला सलमानसोबतच्या ‘टायगर ३’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण करायची आहे. तर दुसऱ्या बाजूला विक्की स्वतःच्या कामाला सुरुवात करेल.
हे ही वाचा – st workers strike : भाजपाची मंडळी तुमची माथी भडकवत आहेत, आणि तुम्ही… अरविंद सावंत यांचे एसटी कामगारांना पत्र