Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'या' दोन चित्रपटांमुळे कतरिनाच्या 'फोन भूत'चे वाजले बारा; पहिल्या दिवशी कमावले अवघे इतके कोटी

‘या’ दोन चित्रपटांमुळे कतरिनाच्या ‘फोन भूत’चे वाजले बारा; पहिल्या दिवशी कमावले अवघे इतके कोटी

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांचा ‘फोन भूत’ चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये कतरिनाने नव्या प्रकारची भूमिका साकारली. या चित्रपटाच्या स्टार कास्टपासून चित्रपटाची कथा देखील मजबूत आहे. मात्र, तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कतरिना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी केवळ 1.75- 2.25 कोटींची कमाई केलेली आहे. दरम्यान, ही कमाई केवळ चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगची असून पहिल्या दिवसाच्या कमाईचे संपूर्ण माहिती अजून समोर आलेली नाही.

‘मिली’ आणि ‘डबल एक्सएल’ देखील झाला प्रदर्शित
कतरिनाच्या चित्रपटासोबतच जान्हवी कपूरचा ‘मिली’ आणि सोनाक्षी सिन्हाचा ‘डबल एक्सएल’ चित्रपट देखील प्रदर्शित झाला. त्यामुळे चित्रपटाची कमाई होण्यास काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

‘फोन भूत’मध्ये आहेत ‘हे’ कलाकार

- Advertisement -

गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि रविशंकरन आणि जसविंदर सिंग बाथ लिखित, ‘फोन भूत’ हा चित्रपट रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित आहे. तसेच कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्यासोबत जॅकी श्रॉफ सुद्धा या चित्रपटात आहे.

कतरिनाचे आगामी प्रोजेक्ट
कतरिनाचा  4 नोव्हेंबर रोजी ‘फोन भूत’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कतरिनासोबत अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी, ईशान खट्टर मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त कतरिना सलमान खानच्या ‘टायगर 3’ चित्रपटामध्ये दिसणार आहे. तसेच आलिया भट्ट आणि प्रियांका सोबत कतरीना ‘जी ले जरा’मध्ये देखील दिसणार आहे.


हेही वाचा :

जान्हवी कपूरचा ‘मिली’ ऑनलाईन झाला लीक; निर्मात्यांचे होणार करोडोंचे नुकसान

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -