घरताज्या घडामोडीKBC 13: स्पर्धकाने फ्लर्ट केल्यामुळे बिग बी म्हणाले, 'बंद करा शो...'

KBC 13: स्पर्धकाने फ्लर्ट केल्यामुळे बिग बी म्हणाले, ‘बंद करा शो…’

Subscribe

‘कौन बनेगा करोडपती १३’मधील अनेक किस्से आहेत, जे खूप व्हायरल होत असतात. केबीसीमध्ये आता अमिताभ बच्चन यांचे नवे रुप पाहायला मिळाले आहे, ज्यामध्ये ते खूप एन्जॉय करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर केबीसी १३चा एक लेटेस्ट प्रोमो व्हायरल होता दिसत आहे. ज्यामध्ये केबीसीमधील स्पर्धक नम्रता शहांसोबत अमिताभ बच्चन फ्लर्ट करता दिसत आहेत. तसेच नम्रता देखील बिग बींसोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. त्याचवेळेस अमिताभ बच्चन निर्मात्यांना शो बंद करण्यास सांगतात. हाच केबीसीतील किस्सा सध्या चांगलाचं चर्चेत आला आहे.

सोनी टीव्हीने केबीसीमधील हा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन निर्मात्यांना शो बंद करण्यास सांगताना दिसत आहेत. कारण ते नम्रता शहांसोबत चहा पिऊ शकतील.

- Advertisement -

प्रोमोच्या सुरुवातील बिग बी नम्रताला म्हणतात की, ‘तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. तुम्ही जे काही गळ्यात घातलं आहे, ते अतिसुंदर आहे.’ त्यानंतर नम्रता बिग बींना विचारतात की, ‘मी तुम्हाला अमित जी म्हणून बोलवू शकते का?’ तर बिग बी म्हणतात, ‘फक्त अमित बोला. निर्माते हा कार्यक्रम बंद करा. मला नम्रता जींसोबत चहा प्यायला जायचे आहे.’

तसेच या शोमध्ये कथक डान्सर नम्रात ‘घर मोरे परदेसिया’ या गाण्यावर डान्स करताना दिसतात. त्यावर अमिताभ बच्चन म्हणतात की, ‘इतक्या वेळा चक्कारा मारलात, चक्क येत नाही?’ यावर त्या उत्तर देतात की, ‘नजर एका ठिकाणी असेल तर चक्क केव्हाच येत आहे.’ अशा प्रकारे केबीसीचा हा नम्रता यांच्यासोबत एपिसोड रंगला आहे.

- Advertisement -


हेही वाचा – Bigg Boss Marathi 3: पहिल्याच आठवड्यात ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -