घरताज्या घडामोडीVideo: KBC 13 मध्ये झाला दुसरा करोडपती; ७ कोटींच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास...

Video: KBC 13 मध्ये झाला दुसरा करोडपती; ७ कोटींच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास स्पर्धक सज्ज

Subscribe

सोनी टीव्हीवरील लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन १३ सुरुवातीपासून चांगलाच चर्चेत आहे. या शोचा प्रत्येक एपिसोड मनोरंजनात्मक असतो. शिवाय या शोमध्ये येऊन अनेक जण आपल्या आयुष्यातील काही गोष्टी शेअर करताना दिसतात. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला शो ‘कौन बनेगा करोडपती’ सीझन १३ मधील आता दुसरा करोडपती भेटला आहे.

नुकताच शोचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये बिग बी या सीझनच्या दुसऱ्या करोडपतीची घोषणा करता दिसत आहेत. अजूनपर्यंत या स्पर्धेकाचे नाव समोर आले नाही आहे. आता हा स्पर्धेक ७ कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास सज्ज झाल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

सोनी टीव्हीने हा प्रोमो शेअर करत लिहिले आहे की, ‘केबीसी १३च्या मंच्यावर पुन्हा एकदा येतोय तो क्षण, जिथे कोणी एक स्पर्धेक ७ कोटी रुपयांचा प्रश्नांसाठी खेळेल. पण हा स्पर्धेक योग्य उत्तर देऊन जिंकेल का ७ कोटी रुपये? हे पाहण्यासाठी तुम्हाला कौन बनेगा करोडपती पाहावे लागले.’

यापूर्वी हिमानी बुंदेला नावाची स्पर्धेक १ कोटी रुपये जिंकून पहिल्या केबीसी १३च्या करोडपती ठरल्या होत्या. हिमानी या एक अंध स्पर्धक होत्या, ज्यांचा २०११ मध्ये अपघात झाला होता.

- Advertisement -

हेही वाचा – Cruise Drug Case: शाहरुखने आर्यनला साडे चार हजाराची पाठवली मनीऑर्डर


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -