“काय झाडी, काय हॉटेल, ओक्के मधी समद…”, ‘दे धक्का 2’ मध्ये शिवाजी साटम यांचा भन्नाट डायलॉग

या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झालं असून या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जाधव कुटुंबाची धमाल कॉमेडी पाहायला मिळत आहे. हा चित्रपटाची कथा पहिल्या भागापेक्षा वेगळी असून सिनेमात सर्व कलाकार हे नव्या रुपात वेगळ्या स्टाईलमध्ये पाहायला मिळत आहेत.

महाराष्ट्राला मनोरंजनाचा ओव्हर डोस देणाऱ्या ‘दे धक्का’ चित्रपटाचा पार्ट 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामुळेच आता पुन्हा एकदा मनोरंजनाची गाडी सुसाट धावू लागणार आहे. इमोशनल,कॉमेडी,भन्नाट डालॉग असा मनोरंजनाचा फुल टू पॅकेज असणारा ‘दे धक्का 2’ सिनेमाचा 5 ऑगस्ट 2022 ला प्रेषकांच्या भेटीस येत आहे.
नुकताच या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झालं असून या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जाधव कुटुंबाची धमाल कॉमेडी पाहायला मिळत आहे. हा चित्रपटाची कथा पहिल्या भागापेक्षा वेगळी असून सिनेमात सर्व कलाकार हे नव्या रुपात वेगळ्या स्टाईलमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळी जाधव कुटुंबियांचा दौरा कोल्हापूर ते लंडना असा असणार आहे. इतकंच नव्हे तर नुकताच प्रसिद्ध झालेला डायलॉग काय झाडी, काय डोंगर हा सुद्धा अभिनेते शिवाजी साटम यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

‘दे धक्का’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता सिनेमाचा दुसरा पार्ट अर्धात धमाल कॉमेडीचा दुसरा डोस ‘दे धक्का 2’ मधून पाहायला मिळणार आहे. खरंतर हा सिनेमा जानेवारीममध्ये रिलीज होणार होता.मात्र कोरोनामुळे याची तारीख काहीशी पुढे ढकलण्यात आली. मात्र 5 ऑगस्टरोजी हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.

या चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर  गौरी इंगवळे, सक्षम कुलकर्णी आणि सिद्धार्थ जाधव ही तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. 2008 साली प्रदर्शित झालेला ‘दे धक्का’ हा चित्रपट litle miss sunshine या हॉलिवूड सिनेमाचा रिमेक होता. यासह मराठीच नाही तर ‘क्रेझी फॅमिली’ नावानं कन्नडमध्ये देखील दाखवण्यता आला. आता येणाऱ्या ‘दे धक्का 2’ मध्ये लंडनमध्ये घडणारी कथा दाखवण्यात येत आहे. सिनेमाचं संपूर्ण शुटींगही लंडनमध्येच करण्यात आलं आहे.

हेही वाचा :प्रेग्नेंट आलियाचे ‘डार्लिंग’च्या प्रमोशन दरम्यानचे फोटो होतायत व्हायरल