KBC 13 : हॉट सीटच्या स्पर्धकाची बिग बींनी घेतली धास्ती, म्हणाले – “हा तर माझी पोल खोलेल…”

KBC 13: The question asked by the boy sitting on the hot seat
KBC 13 : हॉट सीटवर बसलेल्या मुलाने विचारले असे प्रश्न, बिग बी म्हणाले - "हा तर आमची पोल खोलेल"

‘कौन बनेगा करोडपती १३’मध्ये आपण आतापर्यंत होस्ट बिग-बी म्हणजेच अमिताभ बच्चनला स्पर्धकांना प्रश्न विचारताना पाहिलं आहे. मात्र आता ‘कौन बनेगा करोडपती १३’ च्या विशेष भागात आपल्याला अमिताभ बच्चन प्रश्नांची उत्तरं देताना पाहायला मिळणार आहे. खरंतर हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी स्पेशल आठवडा असणार आहे. ज्यामध्ये दररोज वेगवेगळी मुलं स्पर्धक म्हणून ‘KBC १३’ खेळणार आहेत. KBC १३ च्या निर्मात्यांनी या भागाचा प्रोमो रीलीज केला आहे.ज्यामध्ये एक मुलगा हॉट सीटवर बसून गेम खेळत आहे. पण गेम खेळण्यासोबतच हा मुलगा अमिताभ बच्चन यांना, असे काही प्रश्न विचारतो की ते अगदी थक्क होतात.


‘सर, तुमची उंची खूप आहे, मग तुम्ही घरातील सर्व पंखे साफ करता का? तुम्ही आराध्याच्या वार्षिक फंक्शनला जाता तेव्हा लोक फंक्शन पाहतात की तुम्हाला पाहतात? जेव्हा तुम्ही लहान होतात आणि अभ्यास केला नाहीत तेव्हा तुमच्या आईने तुम्हांला मारहाण केली का? प्रोमोमध्ये हॉटसीटवरील मुलगा अमिताभ यांना असे अनेक प्रश्न विचारताना दिसत आहे. त्याचे हे प्रश्न ऐकून धक्का बसलेले बिग बी म्हणतात, ‘हा मुलगा खूप प्रतिभावान माणूस आहे ,भाई हा तर माझी पोल खोलेल.


एकंदरीत ‘कौन बनेगा करोडपती १३’ चा हा मुलांसाठी असणार हा भाग खूप मजेशीर असणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता प्रसारित करण्यात आला. निर्मात्यांनी आणखी एका मुलाचा प्रोमो रिलीज केला , ज्याला हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली आहे. जो अवघ्या १५ वर्षाचा असून,स्टार्ट अप संस्कृती आणि उद्योजकतेला चालना देण्याचे त्याचे स्वप्न आहे. लोकांकडे अनेक कल्पना असतात, पण अनेकवेळा त्यांना आर्थिक पाठबळ मिळत नाही, असे मोठ्या उद्योजकासारखे त्याचे बोलणे पाहून बिग बी अचंबित झाले आहेत.


हे ही वाचा – अनिकेतची सासू अन् मावशी होत्या जिवलग मैत्रिणी, अशी सुरू झाली अनिकेत स्नेहाची लव्ह स्टोरी