Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन KBC13- गणेशोत्सवाच्या निमित्ताने पवनदीप राजनची बिग बींसोबत खास संगीत मैफील

KBC13- गणेशोत्सवाच्या निमित्ताने पवनदीप राजनची बिग बींसोबत खास संगीत मैफील

10 सप्टेंबर रोजी हा एपिसोड टेलिकास्ट होणार आहे.

Related Story

- Advertisement -

गणरायाच्या आगमनाची तयारी(Ganeshotsav) सगळीकडे भक्तीभावाने होत आहे. घरोघरी बाप्पा विराजमान होणार असल्याने वातावरण देखील मंगलमय आणि उत्साहीत झाले आहे. दरम्यान, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘शो कौन बनेगा करोडपती’ (KBC13)मध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. आपल्या सुमधूर आवाजाने ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर इंडियन आयडलच्या (indian idol) स्पर्धकांसोबत सुरांची मैफील सजणार आहे. पवनदीप राजन(paeandeep rajan) बीग बी अमिताभ बच्चन(amitabh bachchan) सोबत केबीसीच्या हॉट सीटवर बसणार आहे. तसेच या शोमध्ये आणखी चार चाँद लावण्यासाठी संमुखप्रिया, सायली कांबळे, अरुणिता कांजीलाल, मोहम्मद दानिश सुद्धा झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे.(KBC13-Pawandeep Rajan’s with Big B on the occasion of Ganeshotsav)

सोनी वाहिनीने(sony tv) त्यांच्या अधीकृत सोशल मीडिया (social media)अकाउंटवर एक प्रोमो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच त्याला कॅप्शन देत लिहलं आहे की, यंदा गणेश चतुर्थीला ज्ञानाच्या मंचावर दीपिका, फराह आणि इंडियन आयडलचे फायनलिस्टसोबत सुराांच्या साथीने विराजमान होणार गणपती बाप्पा, सजणार मोहोत्सवाचा रंग सर्वांसोबत.

प्रोमो पाहा-
- Advertisement -

येत्या 10 सप्टेंबर रोजी हा एपिसोड टेलिकास्ट होणार आहे. इंडियन आयडलीसोबत पुन्हा एकदा सुरांची मैफील पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यात इंडियन आयडलचा विजेता पवनदीप राजनला ‘इंडियन आयडल १२’ ची चमकती ट्राफी आणि २५ लाखांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले होते.


- Advertisement -

हे हि वाचा – Shilpa Shetty : शिल्पाने मनोभावे केलं विघ्नहर्त्याचं स्वागत

- Advertisement -