Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन दीपा चौधरीला दिल्या केदार शिंदेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा !

दीपा चौधरीला दिल्या केदार शिंदेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Subscribe

दीपाने पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

“सगळ्याच भुमिका तू मनापासून करतेयस.. माझ्या मित्राचा संसार सुखाचा करण्यात तुझा महत्त्वपुर्ण सहभाग आहे. वाढदिवस शुभेच्छा !” -केदार शिंदे
——————————————————-
दीपा परब चौधरी महाविद्यालयीन जीवनापासूनच रंगभूमीवर काम करत होती. विविध मालिका आणि जाहिरातींच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर ती झळकलीच शिवाय काही मराठी चित्रपटांमधूनही ती मोठ्या पडद्यावर दिसली. एक गुणी अभिनेत्री म्हणून दीपाची ओळख आहे. अंकुश चौधरी सोबत झालेल्या तिच्या विवाहापश्चात, तिने कुटुंबाकडे आणि मुलगा प्रिन्स याच्याकडे लक्ष द्यायचे ठरविले होते. आता प्रिन्स मोठं झालेला आहे, हे लक्षात घेऊन दीपाने पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.

नुकतेच तीन महिन्यांपूर्वी दीपाचे, १४ वर्षांच्या एका मोठया ब्रेकनंतर अभिनयक्षेत्रात पुनरागमन झाले आहे. झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेतून अश्विनीच्या भूमिकेत प्रेक्षक तिला रोज भेटत आहेत. आज अश्विनी मालिकेतून घराघरातच पोचली नाही, तर चाहत्यांचा तिला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. मालिका शंभर भागांच्या दिशेने प्रवास करीत असतानाच, केदार शिंदेंच्या आगामी चित्रपटात म्हणजे ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातून दीपा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

- Advertisement -

आज दीपाचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने निर्माता दिग्दर्शक केदार शिंदे यांनी दीपाला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ केल्या आहेत. त्यात केदार म्हणत आहेत, “वाढदिवस शुभेच्छा… तुला एवढ्या वर्षांत विविध भूमिकेत मी पाहतोय.. एक मित्र म्हणून कॉलेजच्या जमान्यापासून ते आत्ता माझ्या जीवलग मित्राची बायको, ते अगदी मी दिग्दर्शीत करत असताना एक अभिनेत्री.. सगळ्याच भुमिका तू मनापासून करतेयस.. माझ्या मित्राचा संसार सुखाचा करण्यात तुझा महत्त्वपुर्ण सहभाग आहे. आजच्या घडीला दिग्दर्शक म्हणून मी तुम्हा दोघांसोबत काम केलय करतोय.. धकाधकीत तू घेत असलेली प्रिन्स ची काळजी, त्याला संस्कारात परिपूर्ण करण्याच तुझं व्रत वाखाणण्याजोगं आहे. आपली @baipanbharideva चित्रपट येईल तेव्हा एक वेगळी अभिनेत्री प्रेक्षकांना दिसेल याची मला खात्री आहे. आत्ता पुरतं एवढच…. तू चाल पुढं…”

दीपाचे पती अंकुश चौधरी आणि केदार शिंदे या दोघांची महाविद्यालयीन जीवनापासून खास मैत्री आहे. त्यामुळे अंकुश-दीपाचे सहजीवन आणि त्यातील उतार चढाव केदारनी फार जवळून पहिले आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -