घरमनोरंजनसारा बनली सुशांतची 'स्वीटहार्ट'!

सारा बनली सुशांतची ‘स्वीटहार्ट’!

Subscribe

सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपुतची धमाल केमिस्ट्री केदारनाथ चित्रपटातील स्वीटहार्ट या नवीन गाण्यात पाहायला मिळत आहे.

‘केदारनाथ’ चित्रपटातील पहिलं वहिलं गाणं ‘स्वीटहार्ट’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या चित्रपटातील कलाकार सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. सारा आणि सुशांतची धमाल केमिस्ट्री या गाण्यामध्ये पाहायला मिळत आहे. बॉलीवूडमधील टिपिकल लग्नसोहळ्यातील मुलामुलींची छेडछाड या गाण्यामध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. साराला पिवळ्या सूटमधील पेहराव अगदीच खुलून दिसत असून शाही जोडा पेहेन के, आयी जो बनठन के, वही तो मेरी स्वीटहार्ट है…, असे या गाण्याचे बोल आहे.

- Advertisement -

सत्यघटनेवर आधारीत चित्रपट

नुकताच या चित्रपटाच ट्रेलर रिलीज झाला असून यामधून सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगा सारा अली खान बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची प्रमुख भूमिका असून २०१३ साली झालेल्या नैसर्गिक आपत्तीवर आधारीत हा चित्रपट बनवण्यात आला आहे. तर रॉनी स्क्रूवाला यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. केदारनाथ या देवस्थानी झालेल्या पावसाच्या हाहाकाराचे दृश्य दाखवण्यात आले आहे. एक झलक… प्रकृति के क्रोध का, और साथ होगा सिर्फ प्यार, अशी टॅग लाईन याला दिली आहे. हा चित्रपट ७ डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचा : ‘केदारनाथ’ही अडकला मीम्समध्ये

- Advertisement -

वाचा : ‘केदारनाथ’ चित्रपटाचा टीझर रिलीज!

वाचा : साराला करायचं आहे ‘या’ स्टारला डेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -