घरमनोरंजनअखेर 'केदारनाथ' च्या प्रदर्शनाला मुहूर्त सापडला

अखेर ‘केदारनाथ’ च्या प्रदर्शनाला मुहूर्त सापडला

Subscribe

सारा अली खानचा बॉलीवूड पदार्पणाचा चित्रपट केदारनाथ अखेर या वर्षाच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वारंवार या चित्रपटाच्या चित्रीकरणात अडथळे येत होते. केदारनाथमधील महाप्रलयाच्या सत्य घटनेवर आधारीत हा चित्रपट असणार आहे.

अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लाडकी कन्या सारा अली खान सध्या दोन चित्रपटांमुळे चर्चेत आहे. ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’. खरे तर सारा अभिषेक कपूर दिग्दर्शीत ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र या चित्रपटाचे चित्रीकरण बरेच लांबल्याने रोहित शेट्टीचा ‘सिम्बा’ आधी प्रदर्शित होतो का, असे वाटू लागले होते. अखेर ‘केदारनाथ’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुहूर्त सापडला असून येत्या ३० नोव्हेंबर २०१८ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी मे महिन्यात ‘केदारनाथ’ प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात होते. तर ‘सिम्बा’ डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

simba
सिम्बा चित्रपट

‘केदारनाथ’च्या मार्गात अनेक अडचणी

‘केदारनाथ’ चित्रपटात अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रमुख भूमिकेत असणार आहे. निर्माता प्रेरणा अरोरा आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर यांच्यातील वादामुळे या ‘केदारनाथ’चे चित्रीकरण रखडले होते. पण कालांतराने अभिषेक कपूर व निर्माता प्रेरणा अरोरा यांच्यातील मतभेद निवळला आणि ‘केदारनाथ’चा मार्ग मोकळा झाला. सुरुवातीपासूनच ‘केदारनाथ’च्या मार्गात एक ना अनेक अडचणी येत होत्या. आधी हवामानामुळे या चित्रपटाचे शूटींग रखडले होते. नंतर या चित्रपटातील लीड हिरो सुशांत सिंग राजपूत याच्या मूड स्विंगमुळे चित्रपटाचे शूटींग लांबल्याची चर्चा झाली होती. ‘केदारनाथ’मधील महाप्रलयाचा सीन मुंबईत रिक्रिएट करण्याचा निर्णय झाल्याने शूटींग लांबले होते. अखेर ‘केदारनाथ’चे शूटींगही संपले असून नुकतीच या चित्रपटाची रॅप अप पार्टी संपन्न झाली.

- Advertisement -

सत्य घटनेवर आधारीत

kedarnath
केदारनाथ चित्रपट

‘केदारनाथ’ हा चित्रपट २०१३ मध्ये केदारनाथमध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात सारा एका साध्या सरळ मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. सारा एका श्रीमंत घरातील मुलगी दाखवली असून पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो, असे या चित्रपटाचे कथानक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -