घरमनोरंजनकेरळचा शेतमजूर बनला गायक, मिळाला मोठा ब्रेक

केरळचा शेतमजूर बनला गायक, मिळाला मोठा ब्रेक

Subscribe

केरळच्या शेतमजूराच्या बाबतीत स्वप्नवत गोष्टी घडल्या आहेत. त्याच्या आवाजानं अशी काही जादू केली की, शंकर महादेवननं दिली गाण्याची ऑफर

कोणाचं नशीब कधी पालटेल काहीच सांगता येत नाही. बॉलीवूडमध्ये वर्षानुवर्षे स्ट्रगल केल्यानंतरही ब्रेक मिळत नाही. कितीतरी वर्ष निर्माता आणि दिग्दर्शकांच्या घरांच्या पायऱ्या झिजवूनही रस्त्यावर राहणाऱ्यांचे किस्से काही कमी नाहीत. नेहमी तहानलेल्याच विहिरीजवळ जावं लागतं. पण केरळच्या शेतमजूराच्या बाबतीत स्वप्नवत गोष्टी घडल्या आहेत. त्याच्या आवाजानं अशी काही जादू केली की, विहीरचं तहानलेल्याजवळ आली असं म्हणावं लागेल.

कोण आहे हा शेतमजूर?

केरळच्या एका शेतमजूराचं पूर्ण आयुष्यचं बदलून गेलं आहे. या शेतकऱ्यांचं नाव आहे राजेश. राजेशच्या आवाजानं अशी काही जादू केली की, संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांनी स्वतःहून त्याला संपर्क साधून गाण्याची ऑफर दिली आहे. शंकर महादेवननं काही दिवसांपूर्वी शेतकरी राकेश उन्नी याचा एक व्हिडिओ शेअर केला. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ३० वर्षीय राकेश या व्हिडिओमध्ये कमल हसनच्या ‘विश्वरूपम’मधील ‘उन्नी कानाडु नान’ हे गाणं गाताना दिसत आहे. हे मूळ गाणं शंकर महादेवन यांनीच गायलं होतं. हा व्हिडिओ महादेवन यांनी शेअर केल्यावर लाखो लोकांनी लाईक केला होता. सध्या लंडनमध्ये असलेल्या शंकर महादेवन यांनी राकेशचं भरभरून कौतुक केलं आहे. केवळ कौतुक करून न थांबता राकेशचा त्यांनी शोध लावला. याबाबतदेखील त्यांनी पोस्ट केलं. शेवटी राकेशचा शोध लागला असून त्यांनी राकेशला चेन्नईमध्ये शिफ्ट होण्यास सांगितलं असून भारतात आल्यावर त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

- Advertisement -

राकेश झाला देशभर व्हायरल

राकेशच्या या व्हिडिओनं जगभर हंगामा केला असून त्याच्या या गाण्यासाठी सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या गाण्यामुळं कमल हसनच्या सचिवानंदेखील राकेशला फोन करून लवकरच कमल हसनदेखील त्याच्याशी बोलतील असं सांगितलं आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -